मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

आकृती मध्ये, □PQRS हा चक्रीय आहे. बाजू PQ ≅ बाजू RQ. ∠PSR = 110°, तर (1) ∠PQR = किती? (2) m(कंस PQR) = किती? (3) m(कंस QR) = किती? (4) ∠PRQ = किती? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृती मध्ये, `square`PQRS हा चक्रीय आहे. बाजू PQ ≅ बाजू RQ. ∠PSR = 110°, तर 

(1) ∠PQR = किती?

(2) m(कंस PQR) = किती?

(3) m(कंस QR) = किती?

(4) ∠PRQ = किती?

बेरीज
Advertisements

उत्तर

(1) `square`PQRS हा चक्रीय चौकोन आहे.  .....[पक्ष]

∴ ∠PSR + ∠PQR = 180° ....[चक्रीय चौकोनाचे संमुख कोन परस्परांचे पूरककोन असतात.]

∴ 110° + ∠PQR = 180°

∴ ∠PQR = 180° - 110°

∴ m∠PQR = 70°

(2) ∠PSR = `1/2`m(कंस PQR)  ....[अंतर्लिखित कोनाचे प्रमेय]

∴ 110° = `1/2` m(कंस PQR)

∴ m(कंस PQR) = 220°

(3) ΔPQR मध्ये,

बाजू PQ ≅ बाजू RQ .....[पक्ष]

∴ ∠PRQ ≅ ∠QPR  ......[समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय]

∠PRQ = ∠QPR = x

आता, ∠PQR + ∠QPR + ∠PRQ = 180° .....[त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज 180° असते.]

∴ ∠PQR + x + x = 180°

∴ 70° + 2x = 180°

∴ 2x = 180° - 70°

∴ 2x = 110°

∴ x = `110^circ/2` = 55°

∴ ∠PRQ = ∠QPR = 55°  .....(i)

परंतु, ∠QPR = `1/2`m(कंस QR)  ....[अंतर्लिखित कोनाचे प्रमेय]

∴ 55° = `1/2`m(कंस QR)

∴ m(कंस QR) = 110°

(4) ∠PRQ = ∠QPR = 55°  ....[(i) वरून]

m∠PRQ = 55°  

shaalaa.com
अंतर्लिखित कोनाचे प्रमेय
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: वर्तुळ - सरावसंच 3.4 [पृष्ठ ७३]

APPEARS IN

बालभारती Ganit 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 वर्तुळ
सरावसंच 3.4 | Q 2. | पृष्ठ ७३

संबंधित प्रश्‍न

केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या कंस ACB मध्ये ∠ACB अंतर्लिखित केला आहे. जर m∠ACB = 65° तर m(कंस ACB) = किती? 


दिलेल्या आकृतीतील, जीवा EF || जीवा GH तर सिद्ध करा, जीवा EG ≅ जीवा FH. पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरा आणि सिद्धता लिहा.

सिद्धता:

रेख GF काढला.

∠EFG = ∠FGH .........`square` (i)

∠EFG = `square` ........… [अंतर्लिखित कोनाचे प्रमेय] (ii)

∠FGH = `square` .......… [अंतर्लिखित कोनाचे प्रमेय] (iii)

∴ m(कंस EG) = `square` ......[(i), (ii) व (iii) वरून]

जीवा EG ≅ जीवा FH ..............[एकरूप कंसांच्या संगत जीवा]


सिद्ध करा: एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन हे एकरूप असतात.

 

पक्ष : ∠PQR व ∠PSR एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन आहेत, कंस PTR हा त्या कोनांनी अंतर्खंडित केलेला कंस आहे.

साध्य : ∠PQR ≅ ∠PSR

सिद्धता: 

m∠PQR = `1/2 xx` [m(कंस PTR)] .......(i) `square`

m∠`square = 1/2 xx` [mकंस PTR] ........(ii) `square`

m∠`square` = m∠PSR ..................[(i) व (ii) वरून]

∴ ∠PQR ≅ ∠PSR


आकृतीमध्ये, `square`PQRS हा चक्रीय चौकोन आहे. बाजू PQ ≅ बाजू RQ, ∠PSR = 110°, तर m(कंस PQR) = किती?

 


आकृतीमध्ये, `square`PQRS हा चक्रीय चौकोन आहे. बाजू PQ ≅ बाजू RQ, ∠PSR = 110°, तर m(कंस QR) = किती? 

 


आकृतीमध्ये, वर्तुळाच्या दोन जीवा EF आणि GH परस्परांना समांतर आहेत. O वर्तुळकेंद्र असेल, तर ∠EOG ≅ ∠FOH दाखवा.


`square`ABCD हा चक्रीय चौकोन आहे. m(कंस ABC) = 230°. तर ∠ABC, ∠CDA, ∠CBE, यांची मापे काढा.


सोबतच्या आकृतीत, `square`ABCD हा चक्रीय चौकोन आहे. m(कंस BC) = 90° आणि ∠DBC = 55°, तर ∠BCD चे माप काढा.



वरील आकृतीत जीवा PQ आणि जीवा RS एकमेकींना बिंदू T मध्ये छेदतात. जर ∠STQ = 58° आणि ∠PSR = 24°, तर ∠STQ = `1/2` [m(कंस PR) + m(कंस SQ)] या विधानाचा पडताळा घेण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

ΔPTS मध्ये,

∠SPQ = ∠STQ - `square`  .......[∵ त्रिकोणाच्या बाहयकोनाचे प्रमेय.]

∴ ∠SPQ = 34°

∴ m(कंस QS) = 2 × `square`° = 68°  .......[∵ `square`]

तसेच m(कंस PR) = 2∠PSR = `square`°

∴ `1/2` [m(कंस QS) + m(कंस PR)] = `1/2` × `square`° = 58°  .......(I)

परंतु  ∠STQ = 58° .........(II) [दिलेले]

∴ `1/2` [m(कंस PR) + m(कंस QS)] = ∠______   ........[(I) व (II) वरून]


वरील आकृतीत ∠L = 35° असेल, तर

  1. m(कंस MN) = किती?
  2. m(कंस MLN) = किती?

उकल:

  1. ∠L = `1/2` m(कंस MN) ............(अंतर्लिखित कोनाचे प्रमेय)
    ∴ `square = 1/2` m(कंस MN)
    ∴ 2 × 35 = m(कंस MN)
    ∴ m(कंस MN) = `square`
  2. m(कंस MLN) = `square` - m(कंस MN) ...........(कंसाच्या मापाची व्याख्या)
    = 360° - 70°
    ∴ m(कंस MLN) = `square`

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×