Advertisements
Advertisements
प्रश्न
एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे.
Advertisements
उत्तर
हॉकी संघांतील एकूण खेळाडू = 6 + 4 + 1 = 11
∴ n(S) = 11
समजा, घटना B : निवडलेला संघनायक हा बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे.
हॉकी संघात 6 बचाव करणारे खेळाडू आहेत.
∴ n(B) = 6
∴ P(B) = `("n"("B"))/("n"("S"))`
∴ P(B) = `6/11`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एक फासा फेकला असता नमुना अवकाशातील नमुना घटकांची संख्या ______ आहे.
दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
एकही छापा न मिळणे.
दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे.
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
इस्पिक पत्ता मिळणे.
फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
मिळालेला फुगा लाल असणे.
एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला, तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा.

संधीच्या एका खेळामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा.

- तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे.
- तो बाण विषम अंकावर स्थिरावणे.
- बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे.
- बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे.
0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या 4 च्या पटीत असणे.
0, 1, 2, 3, 4 यांपैकी अंक घेऊन दोन अंकी संख्या तयार करायची आहे. अंकांची पुनरावृत्ती केलेली चालेल, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
ती संख्या 11 च्या पटीत असणे.
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा.
