Advertisements
Advertisements
प्रश्न
एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे
Advertisements
उत्तर
समजा, तीन लाल चेंडू R1, R2, R3,
तीन पांढरे चेंडू W1, W2, W3, आणि
तीन हिरवे चेंडू G1, G2, G3 ने दर्शवू.
∴ नमुना अवकाश
S = {R1, R2, R3, W1, W2, W3, G1, G2, G3}
∴ n(S) = 9
समजा,
घटना C: काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे
∴ C = {R1, R2, R3, W1, W2, W3}
∴ n(C) = 6
∴ P(C) = `("n"("C"))/("n"("S")) = 6/9`
∴ P(C) = `2/3`
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला, तर तो इस्पिकचा असणे या घटनेची संभाव्यता काढा.
फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर पुढील घटनांची संभाव्यता काढा.
i) मिळालेला फुगा लाल असणे.
ii) मिळालेला फुगा निळा असणे.
दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.
कमीत कमी एक छापा मिळणे.
फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
मिळालेला फुगा लाल असणे.
फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
मिळालेला फुगा हिरवा असणे.
एका खोक्यात 5 लाल पेनं, 8 निळी पेनं आणि 3 हिरवी पेनं आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचे आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा.
एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला, तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा.

संधीच्या एका खेळामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 यांपैकी एका अंकावर बाण स्थिरावतो आणि त्या समसंभाव्य निष्पत्ती आहेत. खालील घटनांची संभाव्यता काढा.

- तो बाण 8 या अंकावर स्थिरावणे.
- तो बाण विषम अंकावर स्थिरावणे.
- बाणाने दर्शवलेली संख्या 2 पेक्षा मोठी असणे.
- बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असणे.
एका शाळेतील 200 विद्यार्थ्यांपैकी 135 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो व इतरांना हा खेळ आवडत नाही. सर्व विद्यार्थ्यांतून 1 विद्यार्थी निवडला, तर त्याला कबड्डी हा खेळ आवडत नसण्याची संभाव्यता काढा.
एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा:
घटना A: छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे.
घटना B: काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे.
