मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे ७७ मीटर व ५० मीटर आहे. बागेत १४ मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला,

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका बागेची लांबी व रुंदी अनुक्रमे 77 मीटर व 50 मीटर आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे. बागेजवळील इमारतीच्या गच्चीवर वाळत घातलेला टॉवेल वाऱ्यामुळे उडून बागेत पडला, तर तो बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

आयताकृती बागेचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी

= 77 × 50

∴ आयताकृती बागेचे क्षेत्रफळ = 3850 चौमी

तळ्याची त्रिज्या = `14/2` = 7 मी

वर्तुळाकार तळ्याचे क्षेत्रफळ = πr2 = `22/7 xx 7 xx 7` 

∴ वर्तुळाकार तळ्याचे क्षेत्रफळ = 154 चौमी

∴ टॉवेल बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता,

`= "तळ्याचे क्षेत्रफळ"/"बागेचे क्षेत्रफळ"` 

`= 154/3850 = 1/25`

∴ टॉवेल बागेतील तळ्यात पडला असण्याची संभाव्यता `1/25` आहे.

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: संभाव्यता - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 5 संभाव्यता
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 5 | Q 9 | पृष्ठ १२७

संबंधित प्रश्‍न

योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर पुढील घटनेची संभाव्यता काढा.

i) घटना A: तो पत्ता लाल असणे.

कृती: समजा, नमुना अवकाश 'S’ आहे.

∴ n(S) = 52 

घटना A : काढलेला पत्ता लाल असणे.

∴ एकूण लाल पत्ते = `square` चौकट पत्ते + 13 बदाम पत्ते

∴ n(A) = `square`

∴ P(A) = `square/("n"("S"))` ..............[सूत्र]

P(A) = `26/52`

P(A) = `square`


दोन नाणी फेकली असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

एकही छापा न मिळणे.


दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे.


दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे.


दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा.

पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे.


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

मिळालेला फुगा लाल असणे.


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

मिळालेला फुगा हिरवा असणे.


एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

तिकिटावरील संख्या विषम असणे.


एका पिशवीत 8 लाल व काही निळे चेंडू आहेत. पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता लाल व निळा चेंडू मिळण्याची संभाव्यता यांचे गुणोत्तर 2 : 5, आहे, तर पिशवीतील निळ्या चेंडूंची संख्या काढा.


एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा:

घटना A: छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे.

घटना B: काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×