Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(१) परिणाम लिहा: आपण बदलायला हट्टानं नकार देतो. [१]
परिणाम:
| बदलणं म्हणजे दुसऱ्याच्या भावनांशी समरस होणं, दुसऱ्याला समजून घेणं. आपण बदलायला हट्टानं नकार देतो आणि आयुष्यात विसंवाद ओढवून घेतो. बदललो नाही, तर दुसऱ्या कोणाशी सूर जुळणारच नाहीत. सप्तरंग म्हणजे काय आहे? (एकातून दुसरा बदल आणि त्यातून विकसित झालेलं रंगांचं अनुपम सौंदर्य. सप्तसूर म्हणजे तरी काय आहे? एकापेक्षा वेगळा सूर, त्या सुरावटींच्या सरमिसळीतून उमललेलं संगीत. ही सुरावट बदलली नाही, एका सुरानं दुसरा सूर स्वतःशी जुळवून घेतला नाही; तर सुरावट जमणार कशी? बदल आहे म्हणून तर एकमेकांचं महत्त्व आहे. |
(२) विधाने पूर्ण करा: [२]
(i) सप्तरंग म्हणजे -------------------------------
(ii) सप्तसूर म्हणजे ------------------------------
(३) स्वमत: [३]
'बदलणं म्हणजे दुसऱ्याच्या भावनांशी समरस होणं' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
आकलन
Advertisements
उत्तर
- परिणाम: आयुष्यात विसंवाद ओढवून घेतो.
-
- सप्तरंग म्हणजे एकातून दुसरा बदल आणि त्यातून विकसित झालेले रंगांचे अनुपम सौंदर्य.
- सप्तसूर म्हणजे एकापेक्षा वेगळा सूर, त्या सुरावटींच्या सरमिसळीतून उमललेलं संगीत.
- बदलाला विरोध करून हट्टाने आपलीच भूमिका आग्रहीपणे मांडणे योग्य नाही. निसर्गातही सतत बदल होत असतात उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे ऋतू परस्परांमध्ये बदलत राहतात. पानगळीनंतर झाडांना नव्या पालव्याची चाहूल लागते. बदल हा निसर्गाचा स्वाभाविक नियम आहे. म्हणून माणसानेही काळानुसार बदलायला हवे. आपण एकाच दृष्टिकोनातून विचार करून बदल नाकारू नये. आपण समाजात राहतो, त्यामुळे इतरांच्या आनंद-दुःखात सहभागी होणे हेच खरे मानवत्त्व आहे. इतरांच्या भावना समजून घेणे, त्यांच्याशी सहानुभूती बाळगणे, हीच खरी माणुसकी आहे. म्हणूनच आपल्या हट्टापायी अडून न राहता आपले स्वभाव आणि वागणं योग्य प्रकारे बदलणं गरजेचं आहे. बदल याचा अर्थ स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणणे आणि इतरांच्या भावनांशी समरस होणे होय.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
