हिंदी

Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - अर्थनियोजन [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - अर्थनियोजन - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter 4: अर्थनियोजन

Below listed, you can find solutions for Chapter 4 of Maharashtra State Board Balbharati for गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड.


सरावसंच 4.1सरावसंच 4.2सरावसंच 4.3सरावसंच 4.4संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4Aसंकीर्ण प्रश्नसंग्रह – 4B
सरावसंच 4.1 [Page 87]

Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 अर्थनियोजन सरावसंच 4.1 [Page 87]

1Page 87

'पावन मेडिकल्स' औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे, तर CGST व SGST चा दर किती असेल?

2Page 87

एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल, तर SGST चा दर किती? तसेच GST चा दर किती?

3Page 87

'मेसर्स रियल पेंट' ने प्रत्येकी ₹ 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. GST चा दर 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल?

4Page 87

एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GST चा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल?

5Page 87

खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 1770 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे, तर त्या कारची करपात्र किंमत, त्यावरील CGST व SGST चे गणन करा.

6Page 87

'टीपटॉप इलेक्ट्रॉनिक्स' ने एका कंपनीला दीड टनाचा व करासह 51200 रुपये किमतीचा एअरकंडिशनर पुरवला. एअरकंडिशनरवरील CGST चा दर 14% आकारला, तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा.

  1. SGST चा दर
  2. एसीवरील GST चा दर
  3. एसीची करपात्र किंमत
  4. GST ची एकूण रक्कम
  5. CGST ची रक्कम
  6. SGST ची रक्कम
7Page 87

प्रसादने 'महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स' मधून 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. जीएसटीचा दर 28% आहे, तर प्रसादला ते वॉशिंग मशीन किती रुपयांस मिळाले? कर बीजकात सीजीएसटी व एसजीएसटी किती रुपये असेल ते काढा.

सरावसंच 4.2 [Page 93]

Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 अर्थनियोजन सरावसंच 4.2 [Page 93]

1Page 93

चेतना स्टोअर्सने 01 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,00,500 रुपये जीएसटी दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा.

2Page 93

नझमा या जीएसटी कायदाअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला आहे, तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा.

3Page 93

अमीर एंटरप्राइझने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3800 रुपये जीएसटी भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4100 रुपये जीएसटी गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या, तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर (CGST) व राज्याचा देय कर (SGST) काढा.

4Page 93

चंदीगढ हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण जीएसटी काढा व त्यावरून केंद्राचा देय कर (CGST) व संघराज्याचा देय कर (UTGST) काढा. (संघराज्यात SGST ऐवजी UTGST असतो.)

5Page 93

मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने 6000 रुपयांवर 18% दराने जीएसटी देऊन साैंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10000 रुपयांना विकली, तर या व्यवहारासाठीचे मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची (CGST व SGST) देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा.

6Page 93

खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक (B2C) यासाठीचे करबीजक (Tax Invoice) तयार करा.

नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या.

पुरवठादार: मे ______ पत्ता ______ राज्य ______ तारीख ______ इनव्हॉइस क्रमांक ______ GSTIN ______

वस्तूचा तपशील:

मोबाइल बॅटरीचा दर ₹ 200 1 नग GST चा दर 12 % HSN 8507
हेडफोनचा दर ₹ 750 1 नग GST चा दर 18 % HSN 8518
7Page 93

खाली दिलेल्या माहितीवरून एका व्यापाऱ्याचे दुसऱ्या व्यापाऱ्यासाठीचे (B2B) टॅक्स इनव्हॉइस तयार करा.

नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या.

पुरवठादार - नाव, पत्ता, राज्य, GSTIN, बिल क्रमांक व तारीख.

प्राप्तकर्ता - नाव, पत्ता, राज्य GSTIN

वस्तूंचा तपशील:

(१) पेन्सिल बॉक्स 100, HSN 3924, दर ₹ 20, GST 12%

(२) जिग सॉ पझल्स 50, HSN 9503, दर ₹ 100, GST 12%

सरावसंच 4.3 [Pages 102 - 103]

Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 अर्थनियोजन सरावसंच 4.3 [Pages 102 - 103]

1Page 102

पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा.

उदा. क्र. दर्शनी किंमत मूल्यप्रकार बाजारभाव
1. ₹ 100 सममूल्य ______
2. ______ अधिमूल्य = ₹ 500 ₹ 575
3. ₹ 10  ______ ₹ 5
2Page 102

बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्यावर्षी कंपनीने 20 लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा.

3Page 102

जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा.

कंपनी A: दर्शनी किंमत 2 रुपये आणि अधिमूल्य 18 रुपये असलेले 200 शेअर्स.
कंपनी B: बाजारभाव 500 रुपये असलेले 45 शेअर्स.
कंपनी C: बाजारभाव 10,540 रुपये असणारा 1 शेअर

4Page 102

श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले, तर त्यांना किती शेअर्स मिळतील?

5Page 102

श्री. शांतिलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती?

6Page 103

खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. कंपनी A साठी बाजारभाव 80 रुपये असून लाभांश 16% आणि कंपनी B साठी बाजारभाव 120 रुपये असून लाभांश 20% आहे.

सरावसंच 4.4 [Page 109]

Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 अर्थनियोजन सरावसंच 4.4 [Page 109]

1Page 109

एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली, तर या शेअरची खरेदीची किंमत किती?

2Page 109

एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1 % दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्कम किती?

3Page 109

खालील शेअर खरेदी-विक्रीच्या विवरणपत्रातील रिकाम्या जागा भरा. (B - विकत घेतले, S - विकले)

शेअर्सची संख्या शेअर्सचा बाजारभाव शेअर्सची किंमत दलालीचा दर 0.2% दलालीवर CGST 9% दलालीवर SGST 9% शेअर्सची एकूण किंमत
100 B ₹ 45          
75 S ₹ 200          
4Page 109

श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स, बाजारभाव 50 रुपये असताना विकले तेव्हा त्यांना 4988.20 रुपये मिळाले. दलालीचा दर 0.2% व दलालीवरील जीएसटीचा दर 18% आहे, तर त्यांनी किती शेअर्स विकले ते काढा.

5Page 109

मिस्टर डीसोझा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 200 शेअर्स 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले. त्यावर कंपनीने 50% लाभांश दिला. लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले व उरलेले शेअर्स 75 रुपये अधिमूल्याने विकले. प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली, तर त्यांना या व्यवहारात नफा झाला का तोटा? किती रुपये?

संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4A [Pages 109 - 111]

Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 अर्थनियोजन संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4A [Pages 109 - 111]

खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.

1. (1)Page 109

जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर ______ आहे.

  • 5%

  • 12%

  • 0%

  • 18%

1. (2)Page 109

एकाच राज्यातील व्यापारात केंद्र शासनाकडून _____ आकारला जातो.

  • IGST

  • CGST

  • SGST

  • UTGST

1. (3)Page 109

आपल्या देशात ______ या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही करप्रणाली अमलात आली.

  • 31 मार्च 2017

  • 1 एप्रिल 2017

  • 1 जानेवारी 2017

  • 1 जुलै 2017

1. (4)Page 109

स्टीलच्या भांड्यांवरील वस्तू व सेवा कराचा दर 18 % आहे, तर त्यांवर राज्य वस्तू सेवा कराचा दर ______ आकारण्यात येतो.

  • 18%

  • 9%

  • 36%

  • 0.9%

1. (5)Page 109

GSTIN मध्ये एकूण ______ अंकाक्षरे असतात.

  • 15

  • 10

  • 16

  • 9

1. (6)Page 110

जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो, तेव्हा त्याला उएऊ अंतर्गत _____ व्यवहार म्हणतात.

  • BB

  • B2B

  • BC

  • B2C

2Page 110

25,000 रुपये किमतीच्या एका वस्तूवर व्यापाऱ्याने 10% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 28% उएऊ आकारला, तर एकूण बिल किती रुपयांचे असेल? त्यात CGST व SGST शीर्षकाखाली किती रक्कम असायला हवी?

3Page 110

एका तयार कपड्यांच्या दुकानात 1000 रुपये किमतीच्या ड्रेसवर 5% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5% GST लावून तो विकला, तर तो ग्राहकाला किती रुपयांना पडेल?

4Page 110

सुरत, गुजरातमधील एका व्यापाऱ्याने 2.5 लाख करपात्र किमतीचे सुती कपडे राजकोट, गुजरात येथील व्यापाऱ्याला विकले, तर या व्यवहारात राजकोटमधील व्यापाऱ्याला 5% दराने किती रुपये जीएसटी द्यावा लागेल?

5Page 110

श्रीमती मल्होत्रा यांनी 85,000 रुपये करपात्र किमतीचे सोलार ऊर्जा संच विकत घेतले व 90,000 रुपयांना विकले. वस्तू व सेवा कराचा दर 5% असल्यास त्यांना या व्यवहारात किती रुपयांची वजावट (ITC) व किती रुपये कर भरावा लागेल?

6Page 110

Z-सिक्युरिटी सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीने 64,500 रुपये करपात्र किमतीची सेवा पुरवली. वस्तू सेवा कराचा दर 18% आहे. या सिक्युरिटी सर्व्हिसेस पुरवण्यासाठी कंपनीने लॉन्ड्री सर्व्हिसेस व युनिफॉर्मस् इत्यादी बाबींवर एकूण 1,550 रुपये वस्तू सेवा कर भरला आहे, तर या कंपनीचा (इनपुट टॅक्स क्रेडिट) ICT किती? त्यावरून देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा.

7Page 110

एका व्यापाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षासाठी वस्तू सेवा करासह 84,000 रुपये किमतीचे वॉकीटॉकी संच पुरवले. वस्तू सेवा कराचा दर 12% असल्यास त्याने आकारलेल्या करातील केंद्रीय जीएसटी व राज्य जीएसटी काढा. वॉकीटॉकी संचांची करपात्र किंमत काढा.

8Page 110

एका ठोक व्यापाऱ्याने 1,50,000 रुपये करपात्र किमतीचे विद्युत साहित्य खरेदी केले. ते सर्व साहित्य किरकोळ व्यापाऱ्यास 1,80,000 रुपये करपात्र किमतीला विकले. किरकोळ व्यापाऱ्याने ते सर्व साहित्य ग्राहकाला 2,20,000 रुपये करपात्र किमतीला विकले, तर 18% दराने

  1. ठोक व किरकोळ विक्रीच्या करबीजकांतील करांची आकारणी करा.
  2. ठोक व्यापाऱ्याचा, तसेच किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा
9Page 110

अण्णा पाटील (ठाणे, महाराष्ट्र) यांनी 14,000 रुपये करपात्र किमतीचा एक व्हॅक्युम क्लिनर वसई (मुंबई) येथील एका व्यापाऱ्यास 28% GST दराने विकला. वसईतील व्यापाऱ्याने ग्राहकास तो व्हॅक्युम क्लिनर 16,800 रुपये करपात्र किमतीस विकला, तर या व्यवहारातील खालील किमती काढा.

  1. अण्णा पाटलांनी बनवलेल्या कर बीजकात केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये दाखवला असेल?
  2. वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा व राज्याचा किती कर आकारला असेल?
  3. वसईच्या व्यापाऱ्यासाठी शासनाकडे करभरणा करावयाचा केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर किती येईल ते काढा.
10Page 111

खालील एका वस्तूच्या वितरण व्यवसाय साखळीतील कर बीजक I, II, III मधील वस्तू व सेवा कराच्या आकारणीचे गणन करा. GST दर 12% आहे.

  1. उत्पादकाने, वितरकाने व किरकोळ व्यापाऱ्याने (रिटेलरने) शासनाकडे किती रुपये वस्तू व सेवा कर कोणत्या शीर्षकाखाली भरला हे दाखवणारे विवरणपत्रक तयार करा.
  2. अंतत: ग्राहकास ती वस्तू किती रुपयांना पडेल?
  3. या साखळीतील B2B व B2C बीजके कोणती ते लिहा.
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4B [Pages 111 - 112]

Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड 4 अर्थनियोजन संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4B [Pages 111 - 112]

खालील प्रश्नांसाठी उत्तराचा अचूक पर्याय निवडा.

1. (1)Page 111

दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?

  • हा शेअर 175 रुपये अधिमूल्यावर आहे.

  • हा शेअर 25 रुपये अवमूल्यावर आहे.

  • हा शेअर 25 रुपये अधिमूल्यावर आहे.

  • हा शेअर 75 रुपये अवमूल्यावर आहे.

1. (2)Page 111

50% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल?

  • 50 रुपये

  • 5 रुपये

  • 500 रुपये

  • 100 रुपये

1. (3)Page 111

एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 युनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?

  • 5325

  • 5235

  • 532500

  • 53250

1. (4)Page 111

दलालीवर वस्तू व सेवा कराचा दर ______ आहे.

  • 5%

  • 12%

  • 18%

  • 28%

1. (5)Page 111

शेअर्स विकत घेताना एका शेअरची किंमत काढण्यासाठी बाजारभाव, दलाली व GST यांची ______.

  • बेरीज करावी लागते.

  • वजाबाकी करावी लागते.

  • गुणाकार करावा लागतो.

  • भागाकार करावा लागतो.

2Page 111

100 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 30 रुपये अधिमूल्यावर खरेदी केला. दलालीचा दर 0.3 % आहे, तर एका शेअरची खरेदीची किंमत काढा.

3Page 112

प्रशांतने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर 180 रुपये बाजारभावाने खरेदी केले. त्यावर कंपनीने 40% लाभांश दिला, तर प्रशांतच्या गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा.

4Page 112

जर 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर्स 30 रुपये अवमूल्यावर विकले, तर किती रुपये मिळतील?

5Page 112

100 रुपये दर्शनी किमतीच्या व 120 रुपये बाजारभावाच्या शेअर्समध्ये 60,000 रुपये गुंतवले, तर किती शेअर्स मिळतील?

6Page 112

श्रीमती मीता अग्रवाल यांनी 100 रुपये बाजारभावाने 10,200 रुपयांचे शेअर्स खरेदी केले. त्यांपैकी 60 शेअर्स 125 रुपये बाजारभावाने विकले व उरलेले शेअर्स 90 रुपये बाजारभावाने विकले. प्रत्येक वेळी दलाली 0.1 % दराने दिली, तर या व्यवहारात त्यांना फायदा झाला की तोटा? किती रुपये?

7Page 112

शेअर बाजारात 100 रुपये दर्शनी किमतीचे दोन कंपन्यांचे शेअर्स खालीलप्रमाणे बाजारभाव व लाभांशाच्या दराने आहेत, तर कोणत्या कंपनीतील गुंतवणूक फायदेशीर होईल हे सकारण लिहा.

  1. कंपनी A - 132 रुपये 12%
  2. कंपनी B - 144 रुपये 16 %
8Page 112

श्री. आदित्य संघवी यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 50 रुपये बाजारभाव असताना 50,118 रुपये गुंतवून खरेदी केले. या व्यवहारात त्यांनी 0.2 % दलाली दिली. दलालीवर 18% दराने GST दिला, तर त्यांना 50,118 रुपयांत किती शेअर्स मिळतील?

9Page 112

श्री. बाटलीवाला यांनी एका दिवसात एकूण 30,350 रुपये किमतीच्या शेअर्सची विक्री केली व 69,650 रुपये किमतीच्या शेअर्सची खरेदी केली. त्या दिवशीच्या एकूण खरेदी-विक्रीवर 0.1% दराने दलाली व दलालीवर 18% वस्तू व सेवा कर दिला, तर या व्यवहारात दलाली आणि वस्तू व सेवा करावरील एकूण खर्च काढा.

10Page 112

श्रीमती अरुणा ठक्कर यांनी एका कंपनीचे 100 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 1,200 रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रतिशेअर 0.3% दलाली व दलालीवर 18% GST दिला, तर

  1. शेअर्ससाठीएकूण गुंतवणूक किती रुपये केली?
  2. गुंतवणुकीवर दलाली किती दिली?
  3. दलालीवरील जीएसटी काढा.
  4. 100 शेअर्ससाठी एकूण किती रुपये खर्च झाले?
11Page 112

श्रीमती अनघा दोशी यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 660 रुपये बाजारभावाचे 22 शेअर्स घेतले, तर त्यांनी एकूण किती रुपये गुंतवणूक केली? त्या शेअर्सवरती 20% लाभांश घेतल्यावर 650 रुपये बाजारभावाने ते विकले. प्रत्येक व्यवहारात 0.1% दलाली दिली, तर या व्यवहारात त्यांना किती टक्के नफा किंवा तोटा झाला तो काढा. (उत्तर जवळच्या पूर्णांकात लिहा.)

Solutions for 4: अर्थनियोजन

सरावसंच 4.1सरावसंच 4.2सरावसंच 4.3सरावसंच 4.4संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4Aसंकीर्ण प्रश्नसंग्रह – 4B
Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - अर्थनियोजन - Shaalaa.com

Balbharati solutions for गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 - अर्थनियोजन

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board 4 (अर्थनियोजन) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter 4 अर्थनियोजन are जीएसटी ओळख, करबीजक, व्यवसाय साखळीतील जी.एस.टी., शेअर्स, दर्शनी किंमत व बाजारभाव तुलना, शेअर्सवरील परताव्याचा दर, शेअर्सच्या खरेदी-विक्रीवर दलाली आणि कर, दलालीवर वस्तू व सेवा कर, म्यूचुअल फंड, नियमित आवर्ती गुंतवणूक योजना, एकात्मिक वस्तू व सेवा कर - GST (Integrated GST).

Using Balbharati गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions अर्थनियोजन exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter 4, अर्थनियोजन गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics गणित १ [मराठी] कक्षा १० महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×