Please select a subject first
Advertisements
Advertisements
| कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा! सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा : ‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’ माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी : माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा! |
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
| समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत. |
वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
Concept: undefined >> undefined
Advertisements
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा. (२)
(य) कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचण्यामागील कारण लिहा. (१)
(र) कथेतील भाषायोजनेचे घटक लिहा. (१)
|
कथेत चांगल्या-वाईटाचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्षबिंदू नाट्यपूर्णरीतीने साधता येतो; पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितिजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार, त्याचा दृष्टिकोन, त्याची अनुभव घेण्याची पद्धत यांनुसार कथेचे भाषारूप आणि शैलीविशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणत: प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. |
(२) कथेतील संवादाची वैशिष्ट्ये लिहा. (२)
Concept: undefined >> undefined
बापू गुरुजींनी गावातील शाळेसाठी केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा.
Concept: undefined >> undefined
माहितीपत्रकाचे महत्त्व स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील मुद्द्यांच्या आधारे माहितीपत्रकाची रचना वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
माहितीला प्राधान्य ............ उपयुक्तता ............ वेगळेपण ............ आकर्षक मांडणी ............ भाषाशैली.
Concept: undefined >> undefined
खालील मुद्द्यांच्या आधारे अहवालाची प्रमुख अंगे स्पष्ट करा.
प्रास्ताविक ______ अहवालाचा मध्य ______ अहवालाचा शेवट ______ अहवालाची भाषा ______ अहवालाची आवश्यकता.
Concept: undefined >> undefined
खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा.
वाचकांची अभिरूची ............. तात्कालिक महत्त्व ............. वेगळेपणा ............. वाचकांचे लक्ष वेधणे ............. वृत्तलेखाची शैली.
Concept: undefined >> undefined
‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.
Concept: undefined >> undefined
‘मुखवटा चढवणे’ या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.
Concept: undefined >> undefined
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी अनुभवलेला पाऊस
Concept: undefined >> undefined
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
माझा आवडता खेळाडू
Concept: undefined >> undefined
खालील विषयावर सुमारे २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा.
मी फळा बोलतोय
Concept: undefined >> undefined
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
|
वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यांत विभागलेली आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर, कुठल्यातरी दिशेला. जीवनाची ही टोके साधणार कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. |
(१) चौकटी पूर्ण करा - (२)
(य) विचारांची गती म्हणजे - ______
(र) दिशाविहीन गती म्हणजे - ______
(२) कारणे लिहा - (२)
माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो, कारण ______
(य) ______
(र) ______
(३) स्वमत अभिव्यक्ती -
'यथा प्रमाण गती ही गरज आहे' - हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. (४)
किंवा
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते सविस्तर लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
| दात दुखायला लागला, की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली, की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यांत फार फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडांसारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा? प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला, तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही ! बरे, हे दुखणे तरी साधे, सरळ असावे? तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एकघाव घालीत असतो. असे म्हणतात, की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसांसारखा असावा. नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ का होतो? दातांत आणि चोरांत साम्य असते ते याच बाबतीत. दोघेही रात्री गडबड करतात. दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्त्वचिंतनही करतो. दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो, की दात हेच सत्य आहे. जग मिथ्या आहे. त्या क्षणी संसार असार वाटतो. नेहमी हवेहवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. बायको व मुले हा केवळ भास आहे असे वाटते. |
(१) जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार - (२)
(य) ______
(र) ______
(२) दुखऱ्या दाताबद्दलची लेखकाची मते: (२)
(य) ______
(र) ______
(३) स्वमत अभिव्यक्ती: (४)
लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
किंवा
दातदुखीच्या कथा-व्यथा तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
| समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी : पिंजारलेली दाढी, झिंज्या. हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरूंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोके. इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसचीं चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं, आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची वयस्कांच्या शहरांतील. |
(१) कारणे लिहा.
(य) समुद्र अस्वस्थ होतो, कारण ______
(र) समुद्र शिणून जातो, कारण ______
(२) चौकटी पूर्ण करा.

(३) अभिव्यक्ती:
शहरांतील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात ते स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
|
प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर-नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात. स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदनशैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्परसंबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्षबिंदूही (क्लायमॅक्स) असतो कथेत! अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षक ही असते. 'एक विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधातून घडलेल्या घटनांचे एखादया विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा.' अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखादया कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर एखादी कथा वातावरणनिर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची ही असू शकते. |
(१) एका वाक्यात उत्तरे लिहा: (२)
(य) प्रारंभी कथा कोणत्या हेतूने लिहिली गेली ते लिहा.
(र) कथेची व्याख्या लिहा.
(२) कथा लेखनासाठीचे आवश्यक असणारे चार मुद्दे लिहा. (२)
Concept: undefined >> undefined
