हिंदी

HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा - Maharashtra State Board Important Questions

Advertisements
विषयों
अध्याय
विषयों
मुख्य विषय
अध्याय

Please select a subject first

Advertisements
Advertisements
< prev  2361 to 2380 of 3445  next > 

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यांत विभागलेली आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात.

अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्‍चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर, कुठल्यातरी दिशेला. जीवनाची ही टोके साधणार कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो.

(१) चौकटी पूर्ण करा -    (२)

(य) विचारांची गती म्हणजे - ______

(र) दिशाविहीन गती म्हणजे - ______

(२) कारणे लिहा -      (२)

माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो, कारण ______

(य) ______

(र) ______

(३) स्वमत अभिव्यक्ती -
'यथा प्रमाण गती ही गरज आहे' - हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.      (४)
                                       किंवा
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते सविस्तर लिहा.

Appears in 1 question paper
Chapter: [1.01] वेगवशता
Concept: वेगवशता

खालील ओळींचे रसग्रहण करा.

उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

Appears in 1 question paper
Chapter: [1.02] रोज मातीत (कविता)
Concept: रोज मातीत

खालील ओळींचा अर्थ लिहा:

सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते

काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

Appears in 1 question paper
Chapter: [1.02] रोज मातीत (कविता)
Concept: रोज मातीत

खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे - (२)

(य) ______

(र) ______

(२) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा - (२)

(य) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. (१)

(र) स्वतःचा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते. (१)

सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

फुलं सोन्याची, झेंडू तोडते
बाई तोडते
नाही फुलं ग, देह तोडते
बाई तोडते
घरादाराला, तोरण बांधते
बाई बांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

ऊस लावते, बेणं दाबते
बाई दाबते
नाही बेणं ग, मन दाबते
बाई दाबते
कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते
बाई सांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

(३) अभिव्यक्ती - (४)

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता कष्टकरी शेतकरी स्त्रीचे योगदान स्पष्ट करा.

Appears in 1 question paper
Chapter: [1.02] रोज मातीत (कविता)
Concept: रोज मातीत

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) लेखकाने सांगितलेल्या आनंदाच्या गंमती -        (२)

(य) ______

(र) ______

(२) (य) आनंदाविषयी उताऱ्यात आलेली काव्यपंक्ती -                (१)

(र) प्रस्तुत काव्यपंक्तीविषयी लेखकाने व्यक्त केलेले मत -          (१)

            आनंद सगळ्यांनाच हवा असतो... पण आपला आनंद नेमका कशात आहे, हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद? कुठे नसतो हा आनंद? आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे! ही फक्त कविकल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे!

            आनंदाची गंमत अशी आहे, की तुम्ही शोधू लागलात, की तो दडून बसतो, पकडू गेलात, की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल, तितका तो हुलकावण्या देतो. जितका सहजपणे घ्याल, तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच. तो अनुभवता मात्र यावा लागतो.

            आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो.

            हे खरं आहे, की आनंद सर्वत्र असतो; पण अंतरंगात आनंद असेल, तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं, ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो, तो फक्त आनंदच.

(३) स्वमत अभिव्यक्ती -          (४)

‘आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

किंवा

‘आनंदाची तुमची संकल्पना’ तुमच्या शब्दांत लिहा.

Appears in 1 question paper
Chapter: [1.03] आयुष्य... आनंदाचा उत्सव
Concept: आयुष्य... आनंदाचा उत्सव

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) (२)

दृक-श्राव्य दालनातील कारगिल
युद्धाच्या फिल्ममधील थरार म्हणजे
(य) _________
(र) _________

(२) (२)

कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभा समोर
लेखिकेने घेतलेल्या शपथेनुसार
करावयाची कार्ये
(य) _________
(र) _________

 

मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिंगं होती ती! ज्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, ह्याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी, डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला सलाम केला.

तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हांला कारगिल-युद्धाची फिल्म बघायला तेथील दृक-श्राव्य दालनात नेलं. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस ह्या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एका शहीद झालेल्या वीराच्या आईनं जे म्हटलं, ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, “जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो!” चाबकानं शंभर फटके मारले असते, तर ज्या वेदना झाल्या असत्या; त्यापेक्षाही कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या. आणि त्या विव्हळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली -

“शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. केवळ शब्द नाहीत, तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्यदलातील त्या वीरांचे भाट होऊन त्यांची कवनं गाईन आणि निदान पुढील पाच वर्ष नागरिकांना सोबत घेऊन ह्या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन.”

(३) स्वमत अभिव्यक्ति - (४)

शहीद वीराच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेला परिणाम तुमच्या शब्दांत लिहा.

किंवा

सैनिकी जीवन व सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत लिहा.

Appears in 1 question paper
Chapter: [1.05] वीरांना सलामी
Concept: वीरांना सलामी

रसग्रहण:

सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा:
“चालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा !”
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !

वरील ओळींचे रसग्रहण करा.

Appears in 1 question paper
Chapter: [1.06] रंग माझा वेगळा (कविता)
Concept: रंग माझा वेगळा
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा :
‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

Appears in 1 question paper
Chapter: [1.06] रंग माझा वेगळा (कविता)
Concept: रंग माझा वेगळा

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

Appears in 1 question paper
Chapter: [1.06] रंग माझा वेगळा (कविता)
Concept: रंग माझा वेगळा

सत्त्व उतारा देऊन |
अवघा सारिला तमोगुण |
किंचित् राहिली फुणफुण |
शांत केली जनार्दनें ||
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

Appears in 1 question paper
Chapter: [2.07] विंचू चावला... (भारूड)
Concept: विंचू चावला... (भारूड)

खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृति करा:

(१) कामक्रोधरूपी विंचू-इंगळी उतरवण्याचे उपाय: (२)

(य) ______

(र) ______

(२) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा - (२)

(य) सत्त्व उतारा देऊन, म्हणजे ______.

(अ) जीवनसत्त्व देऊन
(आ) सत्त्वगुणांना आश्रय घेऊन
(इ) सात्त्विक आहार देऊन
(ई) सत्त्वाचे महत्त्व सांगून

(र) ‘विंचू चावला वृश्चिक चावला’, या शब्दांच्या द्विरुक्तीमुळे - ______

(अ) भारूड उत्तम गाता येते.
(आ) वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो.
(इ) भारुडाला अर्थ प्राप्त होतो.
(ई) भारुड अधिक रंजक बनते.

विंचू चावला वृश्चिक चावला।
कामक्रोध विंचू चावला।
तम घाम अंगासी आला ॥धृ.॥

पंचप्राण व्याकुळ झाला।
त्याने माझा प्राण चालिला।
सर्वांगाचा दाह झाला ॥१॥

मनुष्य इंगळी अति दारुण।
मज नांगा मारिला तिनें।
सर्वांगी वेदना जाण।
त्या इंगळीची ॥२॥

ह्या विंचवाला उतारा।
तमोगुण मागें सारा।
सत्त्वगुण लावा अंगारा।
विंचू इंगळी उतरे झरझरां ॥3॥

सत्त्व उतारा देऊन।
अवघा सारिला तमोगुण।
किंचित् राहिली फुणफुण।
शांत केली जनार्दनें ॥४॥

(३) अभिव्यक्ति: (४)

सद्गुण अंगी बाणविण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.

Appears in 1 question paper
Chapter: [2.07] विंचू चावला... (भारूड)
Concept: विंचू चावला... (भारूड)

खालील ओळींचा अर्थ लिहा.

ह्या विंचवाला उतारा।
तमोगुण मागें सारा।
सत्त्वगुण लावा अंगारा।
विंचू इंगळी उतरे झरझरां।।

सत्त्व उतारा देऊन।
अवघा सारिला तमोगुण।
किंचित् राहिली फुणफुण।
शांत केली जनार्दनें ।।

Appears in 1 question paper
Chapter: [2.07] विंचू चावला... (भारूड)
Concept: विंचू चावला... (भारूड)

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) ज्यावर बसून पाखरे कुजबुजतात ती झाडे (२)

(य) ______

(र) ______

(२) लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव (२)

(य) ______

(र) ______

          सर्वांत आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत ‘काय लिहावं?’ याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो, त्या वेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहोराच्या घरट्यांतून, जॅक्रांडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. ‘पहाट झालीय काय?’ असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते, की ‘मी येऊ का तुम्हांला भेटायला?’  पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचंदेखील असंच काहीसं जवळकीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाटदेखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली, की पहाटेलादेखील राहावत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. इतकं हळुवार, की तुम्हांला त्याची गंधवार्तादेखील लागू नये! पहाट कशी होते, हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा म्हणजे तुम्हांलाही त्यातला आल्हाद जाणवेल. त्यातली तरलता जाणवेल. त्यातली नजाकत जाणवेल.

          हा आल्हाद व्यक्त करण्यासाठीच जणू आमच्या बागेतील जॅक्रांडावरची नि गुलमोहोरावरची पाखरं आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो; पण जसजशी पहाट उजाडते, तसतसा तो वाढत जातो.

(३) स्वमत अभिव्यक्ति: (४)

पहाट आणि पाखरे यांचे लेखकाने वर्णन केलेले नाते तुमच्या शब्दांत लिहा.

किंवा

‘तुम्ही अनुभवलेली पहाट’ तुमच्या शब्दांत वर्णन करा.

Appears in 1 question paper
Chapter: [2.08] रेशीमबंध
Concept: रेशीमबंध
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत.

वरील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

Appears in 1 question paper
Chapter: [2.09] समुद्र कोंडून पडलाय (कविता)
Concept: समुद्र कोंडून पडलाय

खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी : पिंजारलेली दाढी, झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या
      बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरूंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोके.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या
     माणसांचे पाय, बसचीं चाकं.
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्‍त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या
     रुळांवरील रहदारी पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.
त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी.
समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या
      पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.

(१) कारणे लिहा.

(य) समुद्र अस्वस्थ होतो, कारण ______

(र) समुद्र शिणून जातो, कारण ______

(२) चौकटी पूर्ण करा.

(३) अभिव्यक्ती:

शहरांतील बाल्यावस्थेच्या जीवनाचे वर्णन तुमच्या शब्दात ते स्पष्ट करा.

Appears in 1 question paper
Chapter: [2.09] समुद्र कोंडून पडलाय (कविता)
Concept: समुद्र कोंडून पडलाय

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(१) लेखकाने शक्तिप्रदर्शन करताना दिलेल्या धमक्या - (२)

(य) ______

(र) ______

(२) दंतवैद्याने केलेल्या दोन क्रिया - (२)

(य) ______

(र) ______

           दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन इतका लीलया दात उपटला, की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो! दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी ‘दात उपटून हातात ठेवीन’, ‘दात घशात घालीन’ अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता, याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली.

           दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत! ज्याने माझे बायकोपुढे हसे केले तोच हा नीच दात. नतद्रष्ट! ‘तुला हेच शासन योग्य आहे’ असे मी उरलेले दातओठ खाऊन मनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला; पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून चार-पाच शेजाऱ्यांना सांगितले, की ‘‘तो तुम्हांला जागवणारा दात गेला. यापुढे दंतसप्ताह नाही.’’

(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)

‘यापुढे दंतसप्ताह नाही,’ लेखकाच्या या विधानाची कारणमीमांसा तुमच्या शब्दांत लिहा.

किंवा

दातदुखीच्या कथा-व्यथा सोदाहरण लिहा.

Appears in 1 question paper
Chapter: [2.1] दंतकथा
Concept: दंतकथा

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

दात दुखायला लागला, की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली, की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यांत फार फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडांसारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा? प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला, तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही ! बरे, हे दुखणे तरी साधे, सरळ असावे? तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एकघाव घालीत असतो. असे म्हणतात, की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसांसारखा असावा. नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ का होतो? दातांत आणि चोरांत साम्य असते ते याच बाबतीत. दोघेही रात्री गडबड करतात.
दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्त्वचिंतनही करतो. दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो, की दात हेच सत्य आहे. जग मिथ्या आहे. त्या क्षणी संसार असार वाटतो. नेहमी हवेहवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. बायको व मुले हा केवळ भास आहे असे वाटते.

(१) जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार -   (२)

(य) ______

(र) ______

(२) दुखऱ्या दाताबद्दलची लेखकाची मते:     (२)

(य) ______

(र) ______

(३) स्वमत अभिव्यक्ती:      (४)

लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.

किंवा

दातदुखीच्या कथा-व्यथा तुमच्या शब्दांत लिहा.

Appears in 1 question paper
Chapter: [2.1] दंतकथा
Concept: दंतकथा

काव्यसौंदर्य.

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,

या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.

Appears in 1 question paper
Chapter: [2.11] आरशातली स्त्री (कविता)
Concept: आरशातली स्त्री

‘रडू नकोस खुळे, उठ!
आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’

या ओळीतील काव्य सौंदर्य तुमच्या भाषेत लिहा.

Appears in 1 question paper
Chapter: [2.11] आरशातली स्त्री (कविता)
Concept: आरशातली स्त्री

खालील ओळींचा अर्थ लिहा:

आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस
          ग मन उलगडून
ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन
         देह तोडलेल्या फुलांसारखे,
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात
जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे
        वरदान समजून

Appears in 1 question paper
Chapter: [2.11] आरशातली स्त्री (कविता)
Concept: आरशातली स्त्री
< prev  2361 to 2380 of 3445  next > 
Advertisements
Advertisements
Maharashtra State Board HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा Important Questions
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा Book Keeping and Accountancy
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा Economics
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा English
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा Geography
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा Hindi
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा History
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा Information Technology
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा Marathi
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा Mathematics and Statistics
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा Political Science
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा Psychology
Important Questions for Maharashtra State Board HSC Arts (English Medium) १२ वीं कक्षा Sociology
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×