Advertisements
Advertisements
प्रश्न
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा.
संक्षेप में उत्तर
Advertisements
उत्तर
- वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन फुलांच्या साहाय्याने होते.
- पुमंग आणि जायांग हे फुलातील अनुक्रमे नर आणि मादी भाग आहेत.
- स्त्रीकेसराच्या प्रत्येक बीजांड मध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूण कोश तयार होतो.
- यात एक एकगुणित अंडपेशी आणि दोन एकगुणित ध्रुवीय केंद्रके असतात.

- परागीभवन क्रियेने परागकोशातील परागीकरण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होऊन तेथे अंकुरित होतात.
- यामुळे त्यात दोन युग्मक आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते.
- दोन युग्मक वाहून नेणारी परागनलिका कुक्षीवृंतामार्गे बीजांडातील भ्रूण कोश पोहोचते. तिथे परागनलिकेचे अग्र फुटून पुंयुग्मक भ्रूण कोशामध्ये सोडले जातात.
- त्यांतील एक पुंयुग्मक अंडपेशी संयोग पावते आणि युग्मनज तयार होतो. या क्रियेला फलन म्हणतात.
- दुसरे पुंयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकांशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होतो. या प्रक्रियेत दोन युग्मक भाग घेतात म्हणून याला विफलन म्हणतात.
- फलन झाल्यानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. या बीजाचे बीजांकुरण झाल्यानंतर नवीन रोपटे तयार होते. अशा रितीने वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन होते.
shaalaa.com
वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Plants)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
परागकोषातील कोष्ठकांमध्ये _______ विभाजनाने परागकण तयार होतात.
एकलिंगी फुलात दिसणाऱ्या बाबी खालीलपैकी __________ आहेत.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
निदलपुंज : निदल : : दलपुंज : ____________
परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात.
व्याख्या लिहा.
पुष्पवृंत
फलनानंतर बीज आणि फळ कशापासून तयार होते?
बीजांकुरण म्हणजे काय?
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
निदलपुंज
