हिंदी

‘उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती’ ‘क्रीडासंकुल’ नगर तर्फे योगासन शिबिर विदयार्थ्यांसाठी सुवर्णसंधी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण नाममात्र प्रवेश फी तज्ज्ञ प्रशिक्षक स्थळ - क्रीडासंकुल सभागृह क्र. 0१ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती’

‘क्रीडासंकुल’ नगर तर्फे योगासन शिबिर विदयार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

शास्त्रशुद्ध प्रशिक्षण

नाममात्र प्रवेश फी

तज्ज्ञ प्रशिक्षक

स्थळ - क्रीडासंकुल सभागृह क्र. 0१

दि. १५ जून ते २० जून

वेळ: सकाळी ७.०० ते ९.००

संपर्क - [email protected] आयोजक

विदयार्थी प्रमुख या नात्याने - तुमच्या शाळेतील 50 विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा.

लेखन कौशल
Advertisements

उत्तर

दिनांक - ५ जून २०२५

प्रति,
आयोजक, 
क्रीडासंकुल, सभागृह क्र. 0१
ई-मेल: [email protected] आयोजक

विषय: योगासन शिबिरात ५० विद्यार्थ्यांच्या सहभागाबाबत विनंती

महोदय,

आपण आयोजित केलेल्या दि. १५ जून ते २० जून या कालावधीत सकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत होणाऱ्या योगासन शिबिराबाबत माहिती मिळाली. ‘उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती’ हा संदेश देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, तज्ज्ञ प्रशिक्षक आणि नाममात्र प्रवेश फी यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरेल, याची आम्हाला खात्री आहे.

आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आम्ही या शिबिरात ५० विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवू इच्छितो. कृपया त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व प्रवेश फी याबाबत माहिती कळवावी.

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या प्रतीक्षेत आहोत.

आपला विश्वासू,
माधव देसाई
नंददीप विद्यालय,
पुणे

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×