Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) कारणे लिहा: (2)
- झाडाची पाने महत्त्वाची असतात, कारण ................
- झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत, कारण .............
|
जगातला सगळ्यांत जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटींपेक्षा जास्त आहे. गुणिले दहा झाडं, विचार करा. अडचण अशी आहे, की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत; पण झाडांची नावं विचारली तर दहा झाडंसुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत. कावळा, कबुतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली, तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत. फुलंसुद्धा पाच-सातच पाठ असतात. पुस्तकातल्या पानांत डोक्याचं खादय असतं. झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात. दोन्हीपण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही; पण झाडं मोठी झाली, तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल, तर गाडी आवश्यक आहे; पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल, तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. |
(2) खालील विधाने चूक का बरोबर ते लिहा: (2)
- पुस्तकातील पाने महत्त्वाची नसतात –
- आसपासचे लाखो पक्षी आपण ओळखू शकतो –
- आपल्या घराभोवती झाडी असणे महत्त्वाचे आहे –
- आपला देश निसर्गसंपन्न होऊ शकेल –
(3) स्वमत: (3)
आप्पांनी शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
उत्तर
(1)
- झाडाची पाने महत्त्वाची असतात, कारण झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असते आणि ती झाडाला वाढण्यासाठी आवश्यक असतात.
- आपला देश वृक्षसंवर्धनात खूप मागे आहे आणि पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावणारी व त्यांची काळजी घेणारी मुले आवश्यक आहेत.
(2)
- हे विधान चूक आहे.
- हे विधान चूक आहे.
- हे विधान बरोबर आहे.
- हे विधान बरोबर आहे.
(3) आप्पा आणि लेखक यांनी शालेय विद्यार्थ्यांकडून पर्यावरणाबद्दल जागरूक राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांनी झाडांवर प्रेम करावे, झाडे लावण्याची सवय लावून घ्यावी आणि त्यांची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले आहे. झाडे, फुले, पक्षी आणि निसर्ग यांची माहिती करून घेऊन निसर्गाशी मैत्री करावी, अशी अपेक्षा आहे. गाड्यांपेक्षा झाडांना अधिक महत्त्व द्यावे, कारण देशाची खरी समृद्धी झाडांमुळे वाढते. देश हिरवागार आणि निसर्गसंपन्न करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी त्यांची अपेक्षा आहे.
