हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

टिपा लिहा. जैवविविधता - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टिपा लिहा.

जैवविविधता

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवांमधील वैयक्तिक व आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था अशा संपूर्ण सजीवसृष्टीमुळे त्या प्रदेशाची जैवविविधता ठरते. ही जैवविविधता तीन पातळ्यांवर असते: आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्था विविधता. यांचा अर्थ अनुक्रमे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता, एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या प्राण्यांमधील किंवा वनस्पतींमधील विविधता आणि प्रत्येक प्रदेशातील परिसंस्थांनी विविधता असा असतो. मानवाच्या विकासाच्या अनेक कृती जैवविविधतेला धोका पोहोचला आहे. ही जैवविविधता टिकवायची असेल तर आपल्याला खास प्रयत्न करावे लागतील. जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये उभारणे, राखीव जैवविभाग घोषित करणे, विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प राबवणे असे प्रयत्न करणे आवश्यक आहे.

shaalaa.com
पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता (Environmental conservation and Bio-diversity)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - स्वाध्याय [पृष्ठ ४६]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
स्वाध्याय | Q 3. इ. | पृष्ठ ४६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×