हिंदी

टीप लिहा. वसाहतवादाचे स्वरूप - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीप लिहा.

वसाहतवादाचे स्वरूप

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

(१) प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे, या प्रक्रियेला 'वसाहतवाद' असे म्हणतात.

(२) वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक प्रकार आहे.

(३) अज्ञात भूमीचा शोध घेऊन त्यावर आपली सत्ता स्थापन करणे, तेथील सोन्याच्या, खनिजाच्या खाणींचा शोध घेणे, आपल्या धर्माचा तेथे प्रसार करणे या बाबी वसाहतवादाचीच वेगवेगळी रूपे आहेत.

(४) वसाहतींमधील कच्चा माल आपल्या देशात नेणे व पक्का माल वसाहतीत विक्री करणे, हक्काची बाजारपेठ म्हणून तिचा उपयोग करणे हे वसाहतवादाचेच लक्षण आहे. औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवाद वाढीस लागला. 

shaalaa.com
वसाहतवाद: अर्थ आणि स्वरूप
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: युरोपीय वसाहतवाद - स्वाध्याय [पृष्ठ १८]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 2 युरोपीय वसाहतवाद
स्वाध्याय | Q ४.१ | पृष्ठ १८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×