Advertisements
Advertisements
प्रश्न
टीप लिहा.
बांडुंग परिषद
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- भारताने १९४७ मध्ये पहिली आशियाई परिषद घेतली. त्या परिषदेत आशियातील २५ राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिषदेत झालेल्या चर्चेतून आशियाई प्रादेशिकतावादाची संकल्पना आकाराला आली.
- आशियातील जनतेचे प्रश्न, आशियाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यांकडे लक्ष वेधणे व परस्पर सहकार्यावर भर देण्यासंबंधी विचार-विनिमय झाला.
- या पार्श्वभूमीवर १९५५ मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली.
- या परिषदेत आफ्रो-आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि परस्पर सहकार्यावर भर देण्याचे ठरले.
- बांडुंग परिषदेमुळे नव्याने स्वतंत्र झालेल्या आशिया-आफ्रिका खंडांतील जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली.
shaalaa.com
निर्वसाहतीकरण : आफ्रिका
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
