हिंदी

स्वमत. दासू आणि दासी यांनी इतर डासांशी केलेल्या चर्चेचा तपशील लिहून, त्यातून निष्पन्न झालेली गोष्ट सांगा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

स्वमत.

दासू आणि दासी यांनी इतर डासांशी केलेल्या चर्चेचा तपशील लिहून, त्यातून निष्पन्न झालेली गोष्ट सांगा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

दासू-दासी यांनी विधानसभेत संपूर्ण अहवाल सादर केला. सगळे विचार करू लागले. त्यातल्या एका डॉक्टर संशोधक डासाने आपण सुईवर लावायचे लोकल अँनेस्थेशिया रसायन शोधल्याचे सांगितले. रसायने पुरविणाऱ्या अनेक वनस्पतींनी मदत करायचे ठरवले आहे. आपल्या शरीरातील बॅक्टेरियांवर उपचार करण्यासाठी आम्हाला ऑन्टिबायोटेक्स घेण्याचा देखील सल्ला दिला गेला. ही कल्पना सर्वांनाच आवडली. वृद्ध डासांनी “माणसाचा कान टाळून शक्‍यतो पायाला चावावे,'' ही मोलाची सूचना केली. त्या माणसाला रात्री शांत झोप लागली. तो डासांच्या गुणगुणण्यात संगीत शोधू लागला. त्याच्या चेहऱ्यावर डासपीटिका आल्या.

shaalaa.com
डासपीटिका
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: डासपीटिका - कृती [पृष्ठ ३०]

APPEARS IN

बालभारती Marathi (Composite) Antarbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 10 डासपीटिका
कृती | Q (७) (२) | पृष्ठ ३०

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


पाठातून शोधून लिहा.

डासांची संवेदनशीलता दाखवणारी वाक्ये.


पाठातून शोधून लिहा.

डासांनी माणसाच्या वाईट गोष्टींवर केलेली टीका दर्शवणारे वाक्य.


माणसाला चावल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून डासांनी सुचवलेले उपाय.

______ ______ ______

स्वमत.

डासपीटिका या पाठातील डास आणि माणूस यांच्यातील संवादाच्या आधारे डासांचे म्हणणे तुमच्या शब्दांत लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा :

(1) आकृती पूर्ण करा:    (2)

डासांनी मग त्यांची जनरल बॉडी मीटिंग ठेवली. दासू-दासीचा अहवाल सगळ्यांनी ऐकला. सगळे गंभीर झाले. विचारविनिमय सुरू झाला. त्यांच्यातला एक डॉक्टर संशोधक पुढे आला. म्हणाला, ‘‘मी एक लोकल ॲनेस्थेशिया देणारं रसायन शोधलंय. आपल्या सुईवर ते लावायचं, की ती खुपसलेली त्याला कळायचंही नाही.’’

सगळ्यांच्या तोंडून एकदम ‘वा!’ असा उद्गार बाहेर पडला. डास पुढाऱ्यानं त्याला विचारलं, ‘‘त्याचं पेटंटबिटंट काही नाही ना?’’

‘‘छे छे, तसं करायला आपण माणसं का आहोत?’’ हशा उसळला.

तो पुढे म्हणाला, ‘‘ज्या वनस्पतीपासून ते रसायन मिळतं, त्या मुबलक आहेत आणि त्यांनी सहकार्य करायचं कबूल केलंय. शिवाय, आपल्या शरीरातल्या त्या जंतूंसाठी आपणच ती अँटिबायोटिक्स घेतली तर? आता राहता राहिला प्रश्न आपल्या गुणगुणीचा. माझे त्यावर प्रयोग सुरू आहेत.’’

(2) एका वाक्यात उत्तर लिहा :     (1)

डासांच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हशा का उसळला ?

(3) स्वमत:   (3)

पाठातील डास आणि माणूस यांच्यातील संवादाच्या आधारे डासांचे म्हणणे तुमच्या शब्दांत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×