हिंदी

संक्षिप्त टिपा लिहा: जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

संक्षिप्त टिपा लिहा:

जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. तत्त्वांची उदारता: जागतिकीकरण ही बदलाची एक प्रक्रिया म्हणून त्याकडे पाहिले तर ‘हस्तक्षेप न करणे’ (laissez faire) हे तत्त्व जागतिकीकरणाचा अविभाज्य हिस्सा आहे. अर्थव्यवस्थेच्या संदर्भात ती खासगी उद्योजकांसाठी खुली असण्याशी जागतिकीकरणाचा संबंध आहे. याला उदारीकरणाची प्रक्रिया म्हणतात. या प्रक्रियेने जीवनाच्या सर्व क्षेत्रांतील लोकांना एकत्र आणले.
  2. खासगी उद्योग: खासगीकरणाची प्रक्रिया ही जागतिकीकरणाशी निकट असलेली प्रक्रिया आहे. खासगीकरणाद्वारे पूर्वी सरकारी नियंत्रणाखाली असलेली आरोग्यसेवा, विमा, आकाशवाणी, दूरदर्शन, शिक्षण यांसारखी सेवा-उद्योग क्षेत्रे खासगी उद्योजकांसाठी खुली करण्यात आली.
  3. नफा मिळवणे: नफा मिळवणे हे खासगीकरणामागील प्रमुख उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे. जागतिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धा तीव्र स्‍वरूपाची झाली. होतकरू व्यक्तिंसाठी अधिक संधी आणि पर्याय यांच्या उपलब्धतेत वाढ झाली. त्याचा फायदा घेत अनेक सेवा पुरवठादारांनी प्रमाणाबाहेर नफा मिळवला. उदाहरणार्थ, व्यापारी तत्त्वावर काम करणाऱ्या अनेक खासगी शिक्षणसंस्था.
  4. बाजारीकरण: जागतिकीकरणामुळे औद्योगिक उत्पादन वाढले. त्याचा परिणाम बाजारीकरणास मोठ्या प्रमाणावर चालना मिळण्यात झाला. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या भव्य बाजारसदृश्य दुकानात गेलात तर तुम्हांला विविध प्रकारच्या उत्पादनांच्या रांगाच रांगा लावलेल्या दिसतील. या भव्य बाजारांमध्येग्राहकांना निवडीसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे चंगळवाद वाढला आणि एक समाज म्हणून आपण अधिक भौतिकवादी झालो, हे निश्चित.
  5. परस्परावलंबित्‍व: ‘जागतिक अर्थव्यवस्था’ या संज्ञेचा परिचय तुम्हांला झालेला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा आपल्यावर काय परिणाम झाला आहे? आपण सर्व परस्परावलंबी आणि परावलंबी झालो आहोत. आपल्यासमोर अशा अनेक उत्पादनांची उदाहरणे आहेत ज्यातील सुटे भाग एके ठिकाणी उत्पादित केले जातात तर, त्यांची जुळणी मात्र खूप दूरवर असणाऱ्या ठिकाणी केली जाते.
  6. ज्ञानाचे सामायिकीकरण: विविध स्रोतांचा सामायिक उपयोग हे जागतिकीकरणाचे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये उत्पादन प्रक्रियेच्या तांत्रिक ज्ञानाच्या (knowhow) आदान-प्रदानाचे सुलभीकरण संगणकीय प्रणालींमुळे झाले आणि या आदान-प्रदानातील भौगोलिक, राजकीय सीमांचा अडसर दूर झाला. ‘बाह्यस्रोतांचा वापर’ (outsourcing) ही संकल्पना आपल्याला परिचित आहे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×