हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शरीराच्या वाढ व विकासासाठी सर्व जीवनप्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शरीराच्या वाढ व विकासासाठी सर्व जीवनप्रक्रिया मोलाचे योगदान कसे देतात?

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. प्रत्येक सजीवाच्या शरीरात निरनिराळ्या संस्था सतत समन्वयाने कार्य करीत असतात. मानवी शरीरात हा समन्वय अधिकच प्रगत असतो.
  2. पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था आणि शरीरातील अंतर्गत व बाहय अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु एकमेकांत असलेल्या समन्वयातून करीत असतात.
  3. पचन संस्था शोषलेले अन्नघटक पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी परिवहन संस्था हृदयाच्या साहाय्याने सतत कार्य करीत असते. त्याच्यासोबत श्वसन संस्थेने घेतलेला ऑक्सिजन प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्यात येतो.
  4. प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकांत ऑक्सिजनच्या साहाय्याने अन्नघटकांचे ऑक्सिडीकरण करून सर्व कार्यांस लागणारी ऊर्जा मिळवली जाते.
  5. या सर्व संस्थांची कार्ये चेता संस्थेच्या साहाय्याने नियंत्रित असतात. या सर्व क्रियांमुळे सजीव जिवंत राहू शकतो. त्याची वाढ व विकास होतो.
shaalaa.com
सजीव आणि जीवनप्रक्रिया (Living organism and life processes)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1 - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2 सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग -1
स्वाध्याय | Q 5. ई. | पृष्ठ २१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×