हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

शास्त्रीय कारणे लिहा. सध्याच्या काळात प्रोबायोटिक्सना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

शास्त्रीय कारणे लिहा.

सध्याच्या काळात प्रोबायोटिक्सना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

संक्षेप में उत्तर
स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

सध्याच्या काळात प्रोबायोटिक्सना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे, याची कारणे पुढीलप्रमाणे:

  1. प्रोबायोटिक्स ही अतिशय पोषक असून त्यात लॅक्‍टोबॅसिलस, ॲसिडोफिलस, लॅक्‍टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्‍टेरिअम बायफिडम इत्यादी क्रियाशील जीवाणू असतात.
  2. हे जीवाणू मानवी आतड्यातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात, पचनक्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात, तसेच क्‍लॉस्ट्रिडीअम सारख्या उपद्रवी सूक्ष्मजीवांना नष्ट करतात.
  3. ही उत्पादने प्रतिक्षमता वाढवतात, तसेच चयापचय क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात.
  4. प्रतिजैविकांमुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीवही अकार्यक्षम होतात, त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे कार्य प्रोबायोटिक्स करत असतात.
  5. अतिसाराच्या उपचारासाठी त्याचबरोबर कोंबड्यांवरील उपचारांसाठी प्रोबायोटिक्सचा वापर केला जातो.
shaalaa.com
प्रोबायोटिक्‍स (Probiotics)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Vigyan aani Tantragyan २ [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 7 ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची
शास्त्रीय कारणे लिहा | Q 1
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×