हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. विद्युतचलित्र - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या.

विद्युतचलित्र

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

विद्युतचलित्र

विद्युतचलित्राची रचना :

यात विद्युतरोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे आयताकृती कुंडल ABCD शक्तिशाली चुंबकाच्या दोन (N व S) ध्रुवांमध्ये अशा प्रकारे ठेवलेले असते की, त्याच्या AB व CD या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेशी लंब असतील. कुंडलाची दोन टोके दुभंगलेल्या कड्याच्या अर्ध भागांना (x व Y) जोडलेली असतात. या अर्ध भागांच्या आतील पृष्ठभागावर विद्युतरोधक आवरण असते आणि हे अर्ध भाग विद्युतचलित्राच्या आसाला पकडून बसवलेले असतात, तर या अर्ध भागांचे बाहेरील पृष्ठभाग विद्युतवाहक असून, ते E व F या स्थिर कार्बन ब्रशना स्पर्श करतात.

 विद्युतचलित्राचे कार्य :

(१) बॅटरी व प्लग कळ अथवा स्विच वापरून ABCD या कुंडलामधून ABCD या दिशेने विद्युत धारा प्रवाहित केली असता, चुंबकीय क्षेत्रामुळे (N → S) AB व CD या दोन्ही भुजांवर बल प्रयुक्त होते. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार AB या भुजेवर हे बल खालच्या दिशेने, तर CD या भुजेवर हे बल वरच्या दिशेने असते. या बलांची परिमाणे समान असतात. AB वरील बल AB ला खालच्या दिशेने ढकलते, तर CD वरील बल CD ला वरच्या दिशेने ढकलते. ही समान परिमाण व परस्परविरोधी दिशा असलेल्या बलांची जोडी, AD या बाजूने पाहिले असता, कुंडल व आस यांना घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध गतीच्या दिशेने फिरवते.

(२) अर्ध्या परिवलनानंतर कड्याचे दुभंगलेले भाग X व Y अनुक्रमे F व E या कार्बन ब्रशच्या संपर्कात आल्यामुळे कुंडलामधून विद्युतधारा DCBA या दिशेने वाहू लागते. त्यामुळे AB वरील बल वरच्या दिशेने, तर CD वरील बल खालच्या दिशेने क्रिया करते. परिणामी कुंडल पूर्वीच्याच गतीच्या दिशेने फिरत राहते.

(३) कुंडलाचे एक परिवलन पूर्ण झाल्यावर (कुंडल 360° मधून फिरल्यावर) विद्युतधारा पुन्हा ABCD या दिशेने वाहते. त्यामुळे AB वरील बल खालच्या दिशेने, तर CD वरील बल वरच्या दिशेने क्रिया करते. परिणामी कुंडल पूर्वीच्याच गतीच्या दिशेने फिरत राहते. विद्युतधारेची दिशा प्रत्येक अर्ध्या परिवलनानंतर विरुद्ध होते, पण कुंडल मात्र एकाच दिशेने फिरत राहते.

प्लग कळ अथवा स्विच वापरून विद्युतधारा खंडित केल्यावर काही वेळाने कुंडल फिरायचे थांबते.

shaalaa.com
विद्युतचलित्र (Electric Motor)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: विद्युतधारेचे परिणाम - स्वाध्याय [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 विद्युतधारेचे परिणाम
स्वाध्याय | Q २. अ. | पृष्ठ ६०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×