हिंदी

पुढील विधान सत्य की असत्य आहे ते कारण देऊन सांगा: भारत सरकारने भाषिक विविधतेला मान्यता दिली आहे. - Sociology [समाजशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विधान सत्य की असत्य आहे ते कारण देऊन सांगा:

भारत सरकारने भाषिक विविधतेला मान्यता दिली आहे.

सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

हे विधान सत्य आहे.

कारण:

  1. बहुभाषिकता हे भारतीय जीवनपद्धतीचे वैशिष्ट्य आहे. सन १९५६ मध्ये, भाषेच्या आधाराने भारतीय राज्यांची पुनर्रचना करण्यात आली. म्हणून विशिष्ट राज्यातील रहिवासी विशिष्ट भाषा बोलतात. भारत हा विविध भाषांनी नटलेला देश आहे.
  2. भारताच्या संविधानाने २२ भाषांना अधिकृत मान्यता दिली आहे. यांपैकी, संस्कृत, तमिळ आणि कन्नड या तीन भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. भारत सरकारने या तीनही भाषांना विशेष दर्जा आणि मान्यता दिली आहे. या अभिजात भाषांची लिखित आणि मौखिक परंपरा १००० वर्षांपेक्षा जुनी आहे. 
  3. भारताच्या भाषिक धोरणा अंतर्गत भाषिक अल्पसंख्याकांना संरक्षणाची हमी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत प्राथमिक शिक्षण मिळावे ही संकल्पना म्हणजे भारताचे खास वैशिष्ट्य आहे.
  4. भाषिक विविधतेचे संवर्धन करण्याची गरज आहे. वैविध्यपूर्ण भाषा बोलणारे लोक दुर्मिळ होत आहेत. मातृभाषा नाकारून इतर प्रमुख भाषांचा स्वीकार करण्यात येत आहे.
  5. भाषिक वैविध्याचे जतन करण्यासाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. भाषिक विविधता हा भारताचा सांस्कृतिक ठेवा आहे.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×