Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा:
|
खाणकाम: खनिजांचा वापर मानव खनिजांचा वापर प्राचीन काळापासून करीत आला आहे. हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जात असे. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्याच्या खनिज वापरशी निगडित आहेत. पाषाणयुगाच्या शेवटच्या टप्प्यावर मानवाने खनिजांचा वापर करण्याचे कौशल्य आत्मसात केले. खनिजांच्या वापरानुसार अनुक्रमे कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग, अणुयुग हे कालखंड अधोरेखित करण्यात आले. मानवाने समुद्र आणि महासागरांच्या तळातूनसुद्धा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाही. पृथ्वीवर खनिजांचे वितरण असमान आहे. त्यामुळे खाणकाम व्यवसाय पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवरच अवलंबून असतो. या व्यवसायाच्या विकासाचा अक्षांशाशी थेट संबंध नसतो. एखाद्या ठिकाणी खनिजांची उपलब्धता असली तरीही प्रत्यक्षात खाणकाम व्यवसाय त्या प्रदेशाची भूगर्भरचना, खनिजांचे मूल्य, हवामान, भांडवल गुंतवणूक, तंत्र, कुशल मजूर पुरवठा इत्यादी घटकांवर अवलंबून असतो. यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. |
प्रश्न:
- मानवाने समुद्र व महासागरांच्या तळातून कोणती खनिज उत्पादने घेतली आहेत?
- प्राचीन काळापासून मानव खनिजांचा वापर कशासाठी करीत आहे?
- खाणकाम व्यवसाय कोणत्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे?
- खाणकाम व्यवसाय हा अक्षांशाशी थेट संबंधित का नाही?
Advertisements
उत्तर
- मानवाने समुद्र व महासागरांच्या तळातून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू ही खनिज उत्पादने घेतली आहेत.
- प्राचीन काळापासूनच मानव हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी इत्यादी बनवण्यासाठी खनिजांचा वापर करत आला आहे.
- खाणकाम व्यवसाय यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे.
- खाणकाम हे पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. खनिजांची उपलब्धता, भांडवली गुंतवणूक, आधुनिक तंत्रज्ञान, कुशल कामगार, जलद वाहतूक सुविधा यांसारखे अनुकूल घटक ज्या ठिकाणी उपलब्ध असतील, अशा कोणत्याही अक्षांशावर खाणकामाचा विकास होऊ शकतो; म्हणूनच खाणकामाचा थेट संबंध अक्षांशांशी नसतो.
