हिंदी

पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा. कर्जरोखे विश्‍वस्त करार - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.

कर्जरोखे विश्‍वस्त करार

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. जर एखाद्या कंपनीला माहितीपत्रक (Prospectus) प्रकाशित करायचे असेल किंवा आपल्या कर्जरोखेची खरेदी करण्यासाठी ५०० हून अधिक लोकांना आमंत्रित करायचे असेल, तर त्या कंपनीने एक किंवा अधिक ‘कर्जरोखे विश्वस्तांची’ (Debenture Trustees) नेमणूक करणे अनिवार्य असते. कर्जरोखे विश्वस्त हे कर्जरोखेधारकांच्या हिताचे रक्षण करण्याचे कार्य करतात. कंपनीने या विश्वस्तांशी एक करार (Contract) करून त्यांची अधिकृतपणे नेमणूक करणे आवश्यक असते. अशा प्रकारच्या कराराला ‘कर्जरोखे विश्वस्त करार’ (Debenture Trust Deed) म्हणून ओळखले जाते. कंपनी आणि विश्वस्त यांच्यामध्ये लेखी स्वरूपात मान्य झालेल्या अटी व शर्तींचा समावेश या विश्वस्त करारात केलेला असतो. तसेच, कर्जरोखे विश्वस्तांची कार्येही यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेली असतात. 
  2. कर्जरोखे विश्वस्त करारामध्ये कर्जरोखेधारकांचे अधिकार, तसेच कर्जरोखे विश्वस्तांची कर्तव्ये आणि अधिकार यांचीही व्याख्या केलेली असते. कंपनीचे सदस्य, तसेच कर्जरोखेधारक या विश्वस्त कराराची पाहणी करू शकतात आणि विहित शुल्क भरून या कराराची प्रत (Copy) प्राप्त करू शकतात.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×