Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
व्यक्तिमत्त्वविषयक पंचघटक प्रारूप स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
रॉबर्ट मॅक्रेर व पॉल कोस्टा यांचा व्यक्तिमत्व सिद्धांत हा गुणतत्व दृष्टिकोनावर आधारित असणाऱ्या व्यक्तिमत्व सिद्धांतापैकी एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. रॉबर्ट मेक्रेर व पोल कोस्टा या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्व विषयक पंचघटक प्रारूप मांडले. त्यांच्या मते व्यक्तिमत्त्वाचे गुणविशेष यांचे मूळ जैविक प्रक्रियांवर आधारित असून ते सांस्कृतिक घटक, सवयी, मुल्ये, कौशल्य इत्यादी बाह्य घटकांनीही प्रभावित होतात.
व्यक्तिमत्त्वातील पाच घटक पुढीलप्रमाणे होत:
- अनुभवांचा मुक्त स्वीकार (O): (Openness to experience) अनुभवांचा मुक्त स्वीकार या गुणविशेषाचा कलात्मक सौंदर्य, भावना, साहस, सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, अनुभवांतील नावीन्य इत्यादी बाबींशी संबध असतो. ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो, अशा व्यक्ती सर्जनशील व मुक्त विचारांच्या दिसून येतात. हा गुणविशेष कमी प्रमाणात असणाऱ्या व्यक्ती कमी सर्जनशील असतात व त्या कलांबाबत संवेदनक्षम दिसून येतात.
- सद्सदविवेकबुद्धी (C): (Conscientiousness) सद्सदविवेकबुद्धी या गुणविशेषाचा स्वयंनियंत्रण या घटकाशी संबध असतो. स्वतःच्या आवेगांवर नियंत्रण ठेवण्याशी व त्यांना दिशा देण्याशी सद्सदविवेकबुद्धीचा संबंध असतो. ज्या व्यक्तींमध्ये हे गुणविशेष जास्त प्रमाणात आहेत अशा व्यक्ती सुसंघटित, जबाबदार, नियोजनबद्ध, पूर्ण कष्टाळू, व शिस्तप्रिय असतात. ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात असतो, अशा व्यक्ती निष्काळजी व बेजबाबदार दिसून येतात.
- बहिर्मुखता (E): (Extroversion) बहिर्मुखता या गुणविशेषाचा व्यक्तीचे बाह्य जगातील विविध प्रक्रियांत रमणे या बाबीशी संबध असतो. ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो, अशा व्यक्ती बोलक्या स्वभावाच्या, उत्साही, धैर्य शील, समाजाभिमुख, आपल्या भूमिकेशी ठाम असतात. याउलट, हा गुणविशेष कमी प्रमाणात असणाऱ्या व्यक्ती शांत, एकलकोंड्या, भिडस्त स्वभावाच्या आढळतात.
- सहमतिदर्शता (A): (Agreeableness) सहमतीदर्शकता या गुणविशेषाचा इतरांशी मिळून मिसळून राहण्याशी आणि सामाजिक मेळ इत्यादी बाबींशी संबध असतो. ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो, अशा व्यक्ती प्रेमळ, इतरांची काळजी करणारे, सहकार्य करणारे दिसून येतात. ज्या व्यक्तीमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात आढळतो, अशा व्यक्ती भांडखोर, असहकार्य करणाऱ्या, इतरांचा द्वेष करणाऱ्या दिसून येतात.
- चेतापदशिता (N): (Neuroticism) चेतापदशिता या गुणविशेषाचा चीड, चिंता, खिन्नता इत्यादी नकारात्मक भावना अनुभवण्याशी संबंध असतो. ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो, अशा व्यक्ती नेहमी तणावग्रस्त, चिंतेत राहणाऱ्या, उदासीन, चिडखोर दिसून येतात. तर ज्या व्यक्तींमध्ये हा गुणविशेष कमी प्रमाणात आढळतो, अशा व्यक्ती संयमी, स्थिर स्वभावाच्या, शांत, समाधानी दिसतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
