Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर १५० ते २०० शब्दांमध्ये लिहा.
बेरोजगारीची कारणे स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
- आवश्यक कौशल्यांचा अभाव: बऱ्याचदा अशी परिस्थिती असू शकते की औद्योगिक किंवा संयुक्त व्यापारी क्षेत्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि अर्जदाराने प्राप्त केलेली कौशल्ये यांचा मेळ बसत नाही. अशा व्यक्ती बेरोजगार राहतात किंवा त्यांच्या पात्रतेपेक्षा कमी पात्रतेची आवश्यकता असलेल्या जागांवर नोकरी करत राहतात.
- नोकऱ्या बदलणे: जेव्हा एखाद्या व्यक्तीची नोकरी काही कारणाने सुटते किंवा व्यक्ती एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीच्या शोधात असते, तेव्हा मधल्या काळात ती बेरोजगार असते.
- अर्थव्यवस्थेतील चढउतार: जागतिक अर्थव्यवस्थेत चढ-उतार होत असतात. उदाहरणार्थ, बांधकाम आणि गृहनिर्माण क्षेत्रात प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या उलाढालींचा काळ आणि त्यानंतर मंदीचा काळ असे चक्र अपरिचित नाही. मंदीच्या काळात कामगारांच्या हातात काम नसण्याची शक्यता मोठी असते. ज्या वेळेस अर्थव्यवस्था चढतीवर असते तेव्हा नोकऱ्यांची उपलब्धता वाढते.
- हंगामानुसार बदलणारी स्थिती: काही उद्योगक्षेत्रांमध्ये ठराविक काळातच कामगारांची आवश्यकता असते. त्यानुसार त्या क्षेत्रातील नोकऱ्यांचा हंगाम ठरतो. उदाहरणार्थ, कृषीक्षेत्र, बँकिंग आणि सागरी वाहतूक. अशा काळात होणाऱ्या स्थलांतरांचा शहरांतील बेरोजगारीच्या स्थितीवर प्रभाव पडतो.
- मागणी आणि पुरवठा यांतील तफावत: अनेक उद्योगांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांची संख्या आणि नोकरीच्या उपलब्ध असणाऱ्या संधी यांमध्ये मोठी तफावत असते. अनेक सुशिक्षित बेरोजगारांना पांढरपेशा नोकरी मिळावी अशी इच्छा असते आणि ते साहजिकच इतर प्रकारची नोकरी करण्यास उत्सुक नसतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official Board Paper
