Advertisements
Advertisements
प्रश्न
प्रत्येक कार्डावर एक संख्या, याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत आहेत. त्यांपैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरची संख्या 5 च्या पटीत असण्याची संभाव्यता ______ असेल.
विकल्प
`1/5`
`3/5`
`4/5`
`1/3`
Advertisements
उत्तर
प्रत्येक कार्डावर एक संख्या, याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्डे एका पिशवीत आहेत. त्यांपैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डावरची संख्या 5 च्या पटीत असण्याची संभाव्यता `underline(1/5)` असेल.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरीची, 6 कॉफीची व 2 पेपरमिंटची चॉकलेट्स आहेत. त्या खोक्यातील एक चॉकलेट काढले, तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा.
घटना A: काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे.
घटना B: काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे.
कृती: समजा, नमुना अवकाश 'S’ आहे.
∴ n(S) = 5 + 6 + 2 = 13
घटना A : काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे.
∴ n(A) = `square`
∴ P(A) = `square/("n"("S"))` ............[सूत्र]
P(A) = `square/13`
घटना B: काढलेले चॉकलेट पेपरमिंटचे असणे.
∴ n(B) = `square`
∴ P(B) = `square/("n"("S"))` ............[सूत्र]
P(B) = `square/13`
अंकांची पुनरावृत्ती न करता 2, 3, 5, 7, 9 या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर खालील घटनांची संभाव्यता काढा.
- ती संख्या विषम असेल.
- ती संख्या 5 च्या पटीत असेल.
खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही?
एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे.
फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.
मिळालेला फुगा लाल असणे.
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असणे.
प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेल्या कार्डावरील संख्या 5 पेक्षा मोठी असणे.
खालील कृती करा.
तुमच्या वर्गाचा एकूण पट n(S) = `square`
वर्गातील चश्मा वापरणार्या विद्यार्थ्यांची संख्या n(A) = `square`
सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(A) = `square`
सर्व विद्यार्थ्यांमधून चश्मा न वापरणारा एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने निवडण्याची संभाव्यता P(B) = `square`
एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेला चेंडू लाल नसणे.
एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.
काढलेला चेंडू लाल किंवा पांढरा असणे
