हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

प्लान्टेशन शेतीच्या खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत:

  1. शेतीचे क्षेत्र ४० हेक्टर किंवा अधिक असते.
  2. शेतीचे क्षेत्र डोंगरउतारावर असल्याने यंत्रांचा वापर फारसा करता येत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते.
  3. प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते, त्या पिकाची लागवड केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे.
  4. या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. उदा., चहा, रबर, कॉफी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी.
  5. या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहतकाळात झाला. बहुतांशी मळ्याची शेती ही उष्ण कटिबंधातच केली जाते.
  6. दीर्घकालिक पिके, शास्त्रशुदूध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, प्रक्रिया करणे इत्यादींमुळे या शेतीसाठीही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते.
  7. मळ्याच्या शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्यावरण ऱ्हास, आर्थिक व व्यवस्थापन इत्यादी समस्या आहेत.
  8. या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश, आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशांत केली जाते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: कृषी - स्वाध्याय [पृष्ठ १६६]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 9 कृषी
स्वाध्याय | Q 2. (4) | पृष्ठ १६६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×