हिंदी

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) चौकटी पूर्ण करा: 2 धान्य न देणारा - ....... पाण्याच्या तुषारांचा रंग - ....... फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी रंग मजेचे, रंग उद्याचे, - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) चौकटी पूर्ण करा: 2

  1. धान्य न देणारा - .......
  2. पाण्याच्या तुषारांचा रंग - .......

फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी

रंग मजेचे, रंग उद्याचे, जपून ठेवू सृष्टी...

धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू

मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी...

रंग मजेचे, रंग उद्याचे

उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे

गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी...

रंग मजेचे, रंग उद्याचे

डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी

फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?

रंग मजेचे, रंग उद्याचे

मिळेल पैसा, मिळेल दौलत, यंत्रांच्या संगती

आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी...

रंग मजेचे, रंग उद्याचे

हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या

गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी...

रंग मजेचे, रंग उद्याचे

(2) एका वाक्यात उत्तरे लिहा: 2

  1. यंत्रांच्या संगतीने काय काय मिळेल?
  2. वृष्टी कोठून होईल? 

(3) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा: 2

  1. अनोखी - ......
  2. सृष्टी - ......
  3. पुष्टी - ......
  4. तुष्टी - ......

(4) काव्यसौंदर्य: 2

‘पृथ्वीला प्रदूषणापासून वाचवले पाहिजे’ या विधानावर तुमचे मत स्पष्ट करा.

आकलन
Advertisements

उत्तर

    1. धान्य न देणारा - संगणक
    2. पाण्याच्या तुषारांचा रंग - फेनधवल (पांढरा)
    1. यंत्रांच्या संगतीने पैसा व दौलत मिळेल.
    2. वृष्टी आभाळातून होईल.
    1. अनोखी - वेगळी (निराळी)
    2. सृष्टी - जग
    3. पुष्टी - दुजोरा (पाठबळ)
    4. तुष्टी - तृप्ती
  1. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन कसे करावे हे सांगताना कवयित्री असे म्हणते की, उद्याचे सुंदर आणि आनंददायी रंग अनुभवायचे असतील तर या सृष्टीचे प्रेमाने जतन करायला हवे. संगणक आपल्याला अन्न देऊ शकत नाही, म्हणून मातीशी नाते जोडून कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे आणि काळ्या आईची सेवा करावी. डोंगर-दऱ्यांमध्ये बियांची पेरणी केली, तर देशी झाडे उगवतील आणि दाट जंगलांची निर्मिती होईल. त्यामुळे पाऊस पडेल आणि धरती हिरवीगार बनेल. दुष्काळ टाळण्यासाठी अधिकाधिक झाडे लावणे आवश्यक आहे. निसर्गाचे सौंदर्य जपणे आणि मातीशी असलेले प्रेम टिकवून ठेवणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी सतत प्रयत्न केले, तरच हिरवाईने नटलेली धरती पाहून मानवाचे मन आनंदित होईल.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×