हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येतो? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येतो?

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. अमावास्येच्या दिवशी सूर्य, चंद्र व पृथ्वी हे तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले, तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. एकाच वेळी पृथ्वीच्या काही भागावर चंद्राची दाट छाया पडते, तर काही भागावर चंद्राची विरळ छाया पडते. पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची दाट सावली पडते, त्या भागातून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो व या भागातून खग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते. 
  2. त्याच वेळी पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची विरळ सावली पडते, त्या भागातून सूर्याचा काही भाग दिसतो; तर काही भाग झाकलेला दिसतो, म्हणजेच या भागातून खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते.
  3. याशिवाय पृथ्वीवरील काही भाग प्रथम चंद्राच्या विरळ छायेत आला असता व त्यानंतर चंद्राच्या दाट छायेत आला असता, त्या भागातून प्रथम खंडग्रास सूर्यग्रहण व त्यानंतर खग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते. अशा प्रकारे, खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही अनुभवास येते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2: सूर्य, चंद्र व पृथ्वी - स्वाध्याय [पृष्ठ १८५]

APPEARS IN

बालभारती Bhugol Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 2 सूर्य, चंद्र व पृथ्वी
स्वाध्याय | Q ५. (२) | पृष्ठ १८५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×