हिंदी

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा: निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा:

निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत.

विकल्प

  • सहमत

  • असहमत

MCQ
सत्य या असत्य
Advertisements

उत्तर

मी दिलेल्या विधानाशी सहमत आहे.

स्पष्टीकरण:

निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत. निर्देशांक म्हणजे एका ठराविक कालावधीत चलामधील बदल (किंवा चलाच्या समुदायामधील बदल) मोजण्यासाठीचे एक साधन होय.

  1. किंमत निर्देशांक: हे वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे मापन करते. ते दोन भिन्न कालावधी दरम्यान किमतीच्या पातळीची तुलना करते.
  2. संख्यात्मक निर्देशांक: याला प्रमाणबद्ध निर्देशांक असेही म्हणतात. अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजते. उदा., कृषी उत्पादन व औद्योगिक उत्पादनाच्या परिमाणात काही कालावधीत झालेला बदल. 
  3. मूल्य निर्देशांक: वस्तूचे मूल्य म्हणजे किंमत व परिमाण यांचा गुणाकार होय. (p × q) मूल्य निर्देशांक हा चलाच्या मूल्यातील बदलाचे रुपयाच्या स्वरूपात मोजमाप करतो. हा निर्देशांक किंमत आणि परिमाण या दोन्हींतील बदलाचे एकत्रीकरण करतो. त्यामुळे तो अधिक माहितीपूर्ण आहे.
  4. विशिष्ट हेतू निर्देशांक: काही विशिष्ट हेतूने हे निर्देशांक तयार केले जातात. उदा. आयात निर्यात निर्देशांक, श्रम उत्पादकता निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक इत्यादी.
shaalaa.com
निर्देशांक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्न

निर्देशांकाची वैशिष्ट्ये

(अ) आर्थिक धोरण ठरवण्यासाठी याचा वापर होतो.

(ब) आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यात मदत होते.

(क) निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे.

(ड) निर्देशांक हे सरासरी काढण्याचे विशिष्ट साधन आहे.


______: मूळ वर्ष किंमत :: P : चालू वर्ष किंमत


संख्यांची अशी शृंखला, की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते.


निर्देशांक हा मूलत: या पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता.


एका चलाच्या साहाय्याने मोजला जाणारा निर्देशांक ______.


विधान (अ): निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे.

तर्क विधान (ब): निर्देशांक हा मूलत: किंमत पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×