Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा.
प्राथमिक बाजार
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
- प्राथमिक बाजारात कंपनी भाग, कर्जरोखे इ. प्रतिभूतींची प्रथमच विक्री करून नवीन भांडवल उभारणी करत असते. हा पूर्णत: नवीन प्रतिभूतींचा बाजार आहे, ज्या ठीकाणी प्रतिभूतींची विक्री प्रथमच गुंतवणूकदारांना केली जाते आणि म्हणूनच याला नवीन प्रतिभूतींचा बाजार असेही म्हटले जाते.
- कंपन्या, सरकार, संस्था इत्यादींना भांडवल उभारणी करून देणे हे प्राथमिक बाजाराचे प्रमुख कार्य आहे. या ठिकाणी गुंतवणूकदार यांच्याकडील अतिरिक्त निधी फायदेशीर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात आणि कंपन्या सुलभतेने भांडवल उभारणी करत असतात. भांडवल उभारणीच्या पद्धतीनुसार प्राथमिक बाजाराचे समहक्क किंवा मालकीचा बाजार व कर्जाऊ बाजार असे प्रकार पडतात. समहक्क बाजारात समहक्क भाग, अग्रहक्क भाग इ. विक्रीस काढले जातात तर कर्जाऊ बाजारात कर्जरोखे, बंधपत्रे, मुदत ठेवी इ. ची विक्री केली जाते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
