हिंदी

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा. पॉल अर्कमन यांनी सांगितलेल्या प्राथमिक भावना स्पष्ट करा. सुख (आनंद) दुःख राग भीती - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.

पॉल अर्कमन यांनी सांगितलेल्या प्राथमिक भावना स्पष्ट करा.

  1. सुख (आनंद) 
  2. दुःख
  3. राग
  4. भीती

खालील प्रश्‍नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.

पॉल अर्कमन यांनी सांगितलेल्या प्राथमिक भावना स्पष्ट करा-

मुद्दे:

  1. सुख (आनंद)
  2. दुःख
  3. आश्चर्य
  4. तिरस्कार
स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर १

भावनेची अशी व्याख्या केली जाते की भावना म्हणजे शारीरिक उत्तेजना, प्रतिसादात्मक क्रिया, विचार, या सर्वांचे एकत्रित संयोजन होय. पॉल अर्कमन यांनी ६ प्रकारच्या प्राथमिक भावना सूचविल्‍या आहेत.

  1. सुख (आनंद): रियाच्या उदाहरणामध्ये तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला वाढदिवसाची पार्टी अचानक देऊन चकित केल्‍यामुळेतिला सुख किंवा आनंदाचा अनुभव येईल. सुख ही एक सकारात्‍मक भावना असून त्‍याचा अनुभव आपल्‍या सर्वांनाच येतो. सुखाची भावना, तृप्ती, समाधान आणि आनंदाशी जोडलेली आहे. आपली मानसिक खुशाली, आरोग्‍य आणि दीर्घायुष्‍य याच्याशी तिचा जवळचा संबंध आहे.
  2. दुःख: आपल्‍या मैत्रिणींशी संबंध तुटल्‍यामुळे रोहनला दुःखाचा अनुभव येईल. निराशा, दुःख आणि नैराश्य ही दुःख भावनेची वैशिष्‍ट्ये आहेत. सुखाप्रमाणेच दुःखाचाही आपल्‍याला अनेक वेळा अनुभव येतो. दुःख वाटणेहे सर्वसामान्य आणि नैसर्गिक असलेतरी दीर्घकालीन दुःख निराशेमध्ये रूपांतरीत होऊ शकते. अर्थातच, दुःखाला तोंड देण्याचे विविध मार्ग आहेत. त्‍याने भावनिकदृष्‍ट्या स्‍थिर होण्यास मदत होते.
  3. राग: मित्राशी मतभेद झाल्‍याने समीर रागाचा अनुभव घेईल. राग ही अशी (तीव्र) शक्‍तिशाली भावना आहे की ज्‍यामध्ये शत्रुत्व, विद्रोह आणि विफलता यांचा समावेश होतो. चेहऱ्यावरील भाव, देहबोली, आवाजाचा स्‍तर, आक्रमक वागणूक यातून राग व्यक्‍त होतो. राग दुधारी तलवारीप्रमाणे आहे.
  4. भीती: सुमी पालकांना आपण परीक्षेत नापास झाल्‍याचे सांगण्याच्या कल्‍पनेने भयभीत असल्‍याने तिला भीतीचा अनुभव येईल. उत्‍क्रांतीचा विचार करता जगण्याच्या दृष्‍टीने भीती ही भावना देखील एक तीव्र शक्‍तीशाली भावना आहे. भीतीमधून धोका व्यक्‍त होत असल्‍यानेही भावना ‘लढा किंवा पळा’ याच्याशी जोडलेली आहे.
shaalaa.com

उत्तर २

  1. सुख (आनंद): रियाच्या उदाहरणामध्ये तिच्या मित्रमैत्रिणींनी तिला वाढदिवसाची पार्टी अचानक देऊन चकित केल्‍यामुळे तिला सुख किंवा आनंदाचा अनुभव येईल. सुख ही एक सकारात्‍मक भावना असून त्‍याचा अनुभव आपल्‍या सर्वांनाच येतो. सुखाची भावना, तृप्ती, समाधान आणि आनंदाशी जोडलेली आहे. आपली मानसिक खुशाली, आरोग्‍य आणि दीर्घायुष्‍य याच्याशी तिचा जवळचा संबंध आहे.
  2. दुःख: आपल्‍या मैत्रिणींशी संबंध तुटल्‍यामुळे रोहनला दुःखाचा अनुभव येईल. निराशा, दुःख आणि नैराश्य ही दुःख भावनेची वैशिष्‍ट्ये आहेत. सुखाप्रमाणेच दुःखाचाही आपल्‍याला अनेक वेळा अनुभव येतो. दुःख वाटणे हे सर्वसामान्य आणि नैसर्गिक असले तरी दीर्घकालीन दुःख निराशेमध्ये रूपांतरीत होऊ शकते. अर्थातच, दुःखाला तोंड देण्याचे विविध मार्ग आहेत. त्‍याने भावनिकदृष्‍ट्या स्‍थिर होण्यास मदत होते.
  3. आश्चर्य: रस्‍त्‍याच्या दुसऱ्या बाजूला शाळेतील अगदी जवळच्या मित्राला अचानकपणे पाहिल्‍यामुळे अस्मितला आश्चर्य वाटेल. आश्चर्य भावना अनपेक्षित घटनेसाठी शारीरिरीत्‍या चकित होण्याशी संबंधित आहे. आश्चर्याची भावना अस्‍मितच्या अनुभवप्रमाणे सकारात्‍मक असते. तशीच ती नकारात्‍मक किंवा तटस्‍थ स्‍वरुपाची सुध्दा असू शकते. उदा. शिक्षकांनी ‘सरप्राईज टेस्‍ट’ घेण्याचे घोषित केले तर तो तुमच्यासाठी आश्चर्याचा नकारात्‍मक अनुभव आहे. काहीवेळा आश्चर्य वाटल्‍यामुळे ॲड्रेनलिन स्त्रावाचे प्रमाण वाढते आणि त्‍यामुळे ‘लढा किंवा पळा’ यासाठी शरीर सज्ज होते.
  4. तिरस्‍कार: अत्‍याचाराची बातमी वाचल्‍यामुळे एमी तिरस्‍कार भावनेचा अनुभव घेईल. उत्‍क्रांतीचा विचार करता हानिकार किंवा प्राणघातक अन्नासाठी दिलेल्‍या प्रतिक्रियेतून तिरस्‍कार भावना निर्माण झाली आहे. त्‍यामुळेच सर्वसाधारणपणे वाईट चवीच्या अन्नासाठी तिरस्‍काराची प्रतिक्रिया दिली जाते. परंतू नको वाटणारे प्रसंग देखील तिरस्‍कार निर्माण करतात. एमीप्रमाणे अनैतिकतेशी संबंधित वर्तनामध्ये ‘नैतिक तिरस्‍कार’ अनुभवला जातो. मानवी भावना साध्या स्‍वरूपाच्या नसतात आणि काही वेळा भावनांची सरमिसळ भावना समजून घेणे अवघड करते.
shaalaa.com

Notes

Students should refer to the answer according to their question.

मूलभूत भावना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×