हिंदी

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा: ज्ञानसागर पुस्तकालय 104, प्रगतीनगर, नाशिक वर्धापन दिनानिमित्त कोणत्याही पुस्तकावर 25% विशेष सवलत दिनांक - 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

ज्ञानसागर पुस्तकालय
104, प्रगतीनगर,
नाशिक

वर्धापन दिनानिमित्त कोणत्याही पुस्तकावर
25% विशेष सवलत

सवलत दिनांक - 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर
वेळ - सकाळी 9 ते रात्री 8
साप्ताहिक सुट्टी - बुधवार
त्वरा करा ........... त्वरा करा ........... त्वरा करा ...........
संपर्क - व्यवस्थापक, ज्ञानसागर पुस्तकालय, नाशिक
E-mail - [email protected]

भाग्येश/भाग्यश्री शिंदे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने पुस्तकांच्या खरेदीवर विशेष सवलत योजना राबवल्याबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.

लेखन कौशल
Advertisements

उत्तर

दिनांक - 10 डिसेंबर 2025

प्रति,
माननीय व्यवस्थापक,
ज्ञानसागर पुस्तकालय, 
104, प्रगतीनगर, 
नाशिक.
E-mail - [email protected]

विषय: पुस्तकांवरील विशेष सवलत योजनेबद्दल अभिनंदन.

महोदय,

तुमच्या ज्ञानसागर पुस्तकालयात 21 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत पुस्तकांवर 25% विशेष सवलत देण्यात येत असल्याचे कळले आणि खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांसाठी ही योजना खरोखरच फार उपयुक्त आहे.

आजच्या काळात वाचनाची सवय कमी होत चालली आहे; अशा वेळी तुम्ही राबविलेली ही योजना निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आवडीची पुस्तके खरेदी करण्याची उत्तम संधी मिळेल. तुमच्या या उपक्रमामुळे वाचनसंस्कृतीला नक्कीच चालना मिळेल, याची मला खात्री आहे.

या सुंदर उपक्रमासाठी मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही अशाच योजना राबवत राहा, ही शुभेच्छा.

आपला विश्वासू,
भाग्यश्री शिंदे
(विद्यार्थी प्रतिनिधी)
सरस्वती विद्यालय
नाशिक - xxx xxx
ई-मेल: [email protected]

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board paper

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×