Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:
| ‘भरतवाक्य’ | |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री − | ....................... |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय− | ....................... |
| (iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे | ....................... |
तालिका पूरा करें
Advertisements
उत्तर
| ‘भरतवाक्य’ | |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री − | मोरोपंत |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय− | सत्संगाचे महत्त्व, चांगल्या संगतीचे फायदे आणि दुर्गुणांपासून दूर राहण्याचा उपदेश. |
| (iii) प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे | मोरोपंतांची ही काव्यरचना सज्जनांच्या सहवासाचे व चांगल्या विचारांचे महत्त्व अत्यंत सहजपणे पटवून देते. कवितेत वापरलेली ओघवती, रसपूर्ण आणि साधी भाषा यामुळे ही रचना श्लोकांसारखी सहज गाता येते. ‘भरतवाक्य’ म्हणजे नाटकाचा अंतिम संवाद; त्याच अनुषंगाने ‘केकावली’तील शेवटची पद्यरचना असल्यामुळे मोरोपंतांनी तिला ‘भरतवाक्य’ हे योग्य नाव दिले असावे. या रचनेत संस्कृतप्रचुर शब्दसंपदा आणि अलंकारांचा मोहक वापर दिसून येतो. ‘सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानी पडो’ ही ओळ सुभाषित म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच, स्वतःला मोर समजून ईश्वराच्या स्मरणातून या रचनेला ‘केकावली’ हे नाव दिले गेले, हा संदर्भही रंजक वाटतो. या सर्व कारणांमुळे ही कविता मला अत्यंत आवडते. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Board paper
