हिंदी

खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. छळून घ्या संकटांनो, संधी पुन्हा मिळणार नाही कर्पुराचा देह माझा, जळून पुन्हा जळणार नाही

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

छळून घ्या संकटांनो, संधी पुन्हा मिळणार नाही
कर्पुराचा देह माझा, जळून पुन्हा जळणार नाही
साहीन मी आनंदाने तुमचे वर्मी घाव
असाच नेईन किनाऱ्याशी चुकलेली नाव
मार्ग बिकट आला तरी मागे वळणार नाही
निराश मी होणार नाही झुंजता तुमच्यासवे
मनी माझ्या जागतील आकांक्षांचे लाख दिवे
वेदना झाल्या तरी अश्रूही गळणार नाही
आव्हान माझे तुम्हांला चालून या माझ्यावरी
धैर्याची कट्यार माझी पाजळील तुमच्यावरी
संकटांनो, सावधान मी गाफील असणार नाही
  1. दिलेली कविता वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायांमधून निवडा. (कोणतेही 4) (4 × 1 = 4)
    1. कवीला आपला देह कशाचा वाटतो?
      1. मातीचा
      2. हाडामासांचा
      3. कर्पुराचा
      4. फुलांचा
    2. कोणत्या मार्गाचा उल्लेख केला आहे?
      1. सरल
      2. बिकट
      3. वाकडा
      4. वळणाचा
    3. लाख दिवे कशास म्हटले आहे?
      1. संकटांना
      2. आकांक्षांना
      3. वेदनांना
      4. अश्रूंना
    4. कवी जवळ कोणती कट्यार आहे?
      1. सोन्याची
      2. पराक्रमाची
      3. सावधतेची
      4. धैर्याची
    5. मार्ग बिकट आला तर कवी काय करणार आहे?
      1. मागे वळणार नाही.
      2. नवी वाट शोधणार आहे.
      3. मागे वळणार आहे.
      4. प्रवास थांबविणार आहे.
  2. दिलेल्या कवितेच्या आधारे पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 3) (3 × 1 = 3)
    1. कवी कोणाला उद्देशून बोलत आहे?
    2. कवी आनंदाने काय सहन करणार आहे?
    3. कवीने कोणते आव्हान दिले आहे?
    4. कवी कटारींचा उपयोग कशासाठी करणार आहे?
    5. शेवटी कवी स्वतःबद्दल काय म्हणतात?
आकलन
Advertisements

उत्तर

    1. कर्पुराचा
    2. बिकट
    3. आकांक्षांना
    4. धैर्याची
    5. मागे वळणार नाही.
    1. कवी संकटांना उद्देशून बोलत आहे.
    2. कवी आनंदाने वर्मी घाव सहन करणार आहे.
    3. कवीने संकटांना आपल्या मार्गावर येण्याचे आव्हान दिले आहे.
    4. कवी कटारींचा उपयोग धैर्य दाखवण्यासाठी करणार आहे.
    5. शेवटी कवी म्हणतात की संकटांपुढे ते कधीही गाफील होणार नाहीत.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Set 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×