हिंदी

झाडे लावा..... झाडे जगवा वन विभाग, औरंगाबाद यांचे तर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त * रोपांचे मोफत वाटप * दिनांक 5 जून संपर्क: वन विभाग कार्यालय, उस्मानपूरा रेल्वे स्टेशन रोड, - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

झाडे लावा..... झाडे जगवा

वन विभाग, औरंगाबाद 

यांचे तर्फे

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त

* रोपांचे मोफत वाटप *

दिनांक 5 जून

संपर्क:

वन विभाग कार्यालय, उस्मानपूरा

रेल्वे स्टेशन रोड, औरंगाबाद -431001

[email protected]

अन्वर/सायरा खान, न्यू इंग्लिश स्कूल, औरंगाबाद विद्यार्थी प्रमुख या नात्याने शाळेसाठी रोपांची मागणी करणारे पत्र वन विभाग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना लिहा.

लेखन कौशल
Advertisements

उत्तर

दिनांक: २५ मे २०२५

प्रति,
मा. अधिकारी,
वन विभाग कार्यालय,
उस्मानपूरा, रेल्वे स्टेशन रोड,
औरंगाबाद – 431001.

विषय: शाळेतील वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी

माननीय महोदय,

सप्रेम नमस्कार!

मी सायरा खान, न्यू इंग्लिश स्कूल, औरंगाबाद येथे विद्यार्थी प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आमच्या शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि. ५ जून रोजी वन विभाग, औरंगाबाद यांच्या तर्फे “झाडे लावा..... झाडे जगवा” या उपक्रमांतर्गत रोपांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, ही माहिती आम्हाला मिळाली. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी आहे.

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आम्हाला विविध प्रकारची देशी व उपयुक्त अशी रोपे आवश्यक आहेत.

आमच्या विनंतीला मान देऊन आपण आम्हांस या स्तुत्य उपक्रमात सहभागी करून घ्याल, अशी आशा वाटते. त्याकरता आपण ही रोपे लवकरात लवकर शाळेच्या पत्त्यावर पाठवून द्यावीत ही नम्र विनंती.

आवश्यक रोपांची संख्या आणि प्रकार:

  1. छायादार वृक्षाचे रोपे - १५
  2. फळझाडांची रोपे - १०
  3. औषधी वनस्पतींची रोपे - २0
  4. फुलझाडांची रोपे - २0

कळावे,

आपली विश्वासू,
सायरा खान
विद्यार्थी प्रमुख
न्यू इंग्लिश स्कूल, औरंगाबाद

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×