Advertisements
Advertisements
प्रश्न
गवताचे पाते व पान यांच्या स्वभाववैशिष्ट्यांत बदल झाला आहे, अशी कल्पना करून कथेचे पुनर्लेखन करा.
Advertisements
उत्तर
हिवाळा नुकताच सुरू झाला होता. झाडावर एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली.
पट... पट... पट...
त्यांचा तो पट... पट... पट... असा कर्णकटू आवाज
तो आवाज ऐकून धरणीमातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, "अहो आजोबा, आजोबा, केवढ्याने पडलात! लागलंबिगलं तर नाही ना?"
पानाला बरे वाटले. प्रेमळपणे म्हणाले, "काय रे बाळा? तुला त्रास झाला का रे?"
"छे, छे, आजोबा. तुम्ही ठीक आहात ना?"
"काय सांगू बाळा! इतका झकास तरंगत येताना सारखे वाटत होते की असेच खूप वेळ सुखाने तरंगत राहावे. पण आता वय झाले ना! काय करणार?"
“असं का बोलता? वय झालं म्हणता, पण तरुणांपेक्षाही तुमचे मन तरुण आहे. किती आनंदात आहात तुम्ही!"
हे ऐकत ऐकत ते पान आनंदाने मातीत मिसळले.
ते पुन्हा जागे झाले, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने! त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पाण्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. पाते थंडीने कुडकुडत होते. ते धरणीमातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडेतिकडे झाडांवर पाने सळसळत होती... पट पट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती!
ते गवताचे पाते लगबगीने उठले. स्वतःशीच पुटपुटले. आज दुसरे आजोबा खाली आले वाटतं. चला, चला, पटापट जायला हवं. एखाद्या आजोबांना मदतीची गरज असेल कदाचित!
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

कारणे लिहा.
झोपी गेलेल्या चिमुकल्या गवताच्या पात्यानं गळून पडणाऱ्या पानाकडे तक्रार केली, कारण ______
कारणे लिहा.
‘अरसिक गवताच्या पात्याला गाणं समजणार नाही’ असे गळून पडणारे पान म्हणाले, कारण ______
कारणे लिहा.
वसंताच्या संजीवक स्पर्शाने पानाचे रूपांतर चिमुकल्या पाण्यात झाले, कारण ______
‘माणसातील ठरावीक मनोवृत्तीची पुनरावृत्ती वारंवार होत असते’, हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
गवताच्या पात्याच्या ठिकाणी तुम्ही असता, तर तुम्ही पानाला काय उत्तर दिले असते?
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) कारण लिहा. (२)
- झाडावरून पिकलेली पाने गळून पडू लागली...
- गवताच्या पात्याच्या स्वप्नांचा चुराडा होण्याचे कारण...
|
हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. |
२) दिलेल्या घटना कालानुक्रमे लावा. (ओघतक्ता तयार करा.) (२)
विधाने-
अ) पान धरणीमातेच्या कुशीत झोपी गेले.
ब) गवताच्या पात्याच्या गोड स्वप्नांचा चुराडा झाला.
क) हिवाळा सुरू झाला होता.
ड) चिमणे गवताचे पाते जागे झाले.
३) स्वमत- (३)
रूपक कथेची वैशिष्ट्ये प्रस्तुत रूपककथेद्वारे स्पष्ट करा.
