हिंदी

गोदामाची कोणतीही चार कार्ये स्पष्ट करा. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गोदामाची कोणतीही चार कार्ये स्पष्ट करा.

स्पष्ट कीजिए
Advertisements

उत्तर

  1. मालाची साठवण/संचयन: हे गोदामाचे मूलभूत कार्य आहे. अतिरिक्त उत्पादने जी ताबडतोब आवश्यक नाहीत ती उत्पादने गोदामामध्ये सुरक्षितरित्या साठवली जाऊ शकतात आणि आवश्यकतेनुसार पुरवली जाऊ शकतात.
  2. किंमत स्थिरीकरण: किंमत स्थिरीकरण प्रक्रियेत गोदामे महत्त्वाची भूमिका बजावतात. किंमत स्थिरीकरण हे वेळ उपयुक्तता (Time utility) साधून केले जाते. गोदामांमध्ये सहसा मालाचा साठा मोठया प्रमाणावर केला जातो. जेव्हा बाजारपेठेमध्ये वस्तूंची कमतरता असते तेव्हा त्या वस्तू गोदामांद्वारे पुरविल्या जातात, ज्यामुळे मागणी आणि पुरवठयाच्या फरकामुळे किंमतीत वाढ होण्यापासून टाळण्यासाठी किंमत स्थिर होण्यास मदत होते.
  3. जोखीम पत्करणे: जेव्हा वस्तू गोदामांमध्ये साठविल्या जातात तेव्हा चोरी, आग इत्यादी स्वरूपात त्यांना बरीच जोखीम स्वीकारावी लागते. गोदामे अशा प्रकारे बनविली जातात जेणेकरून हे धोके कमी होतात. गोदामचालकावर वस्तू सुरक्षित ठेवण्याची आणि योग्य ती काळजी घेण्याचे बंधन असते. वस्तू अथवा मालाच्या होणाऱ्या हानीसाठी व नुकसानीसाठी गोदामचालक जबाबदार असतात.
  4. वित्त पुरवठा: गोदाम चालविणाऱ्या संस्थांकडून किंवा इतर वित्तिय संस्थांकडून गोदामात साठविलेल्या मालावर/वस्तूंवर वित्त पुरवठा केला जाऊ शकतो. सदर वस्तू/माल या वित्तिय संस्थांसाठी सुरक्षितता (Security) म्हणून काम करतात. अशा पद्‌धतीने गोदामे व्यावसायिकांसाठी अर्थसहाय्य देण्याचे काम करतात.
  5. वर्गवारी आणि प्रतवारी: आजकाल बऱ्याचश्या गोदामांमध्ये वर्गवारी आणि प्रतवारी करण्यासाठी तसेच वेष्टनासाठी व इतर प्रकारच्या प्रक्रियांसाठी सुविधा पुरविल्या जातात. मागणीप्रमाणे मालाचे सोयीस्कर वेष्टण (Packaging) केले जाते.
  6. वाहतूक: गोदामधारक मोठया प्रमाणावर माल गोदामात ठेवणाऱ्यांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देतात. सदर वाहतुकीमध्ये माल एका ठिकाणाहून गोळा करून इच्छित स्थळी पोहोचविण्याचे काम केले जाते.
  7. वेळ आणि स्थल उपयोगिता: गोदामे वस्तूंची मागणी येईपर्यंत वस्तू जतन करून वेळ उपयोगिता निर्माण करतात. तसेच ज्या ठिकाणी वस्तूंची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माल पोहोचवून स्थल उपयोगिता निर्माण करतात.
  8. प्रक्रिया: काही वस्तू जशा बनविल्या जातात तशाच त्या वापरल्या जात नाहीत. सदर उत्पादनांवर ठरावीक प्रक्रिया करून वापरायोग्य बनविल्या जातात. उदाहरण - तांदूळ पॉलिश केला जातो, फळे पिकवली जातात इ. काही वेळा गोदामचालक या मालकांना प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरवितात.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×