हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदा. इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

जनांसाठी इतिहास

        इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदा. इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो, दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयांचा काही उपयोग नसतो, इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही, इत्यादी.              अशा गैरसमजांवर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे 'जनांसाठी इतिहास'.          परदेशातील अनेक विद्यापिठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतात बंगळुरू येथे 'सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी' या संस्थेत 'सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी' हा स्वतंत्र विभाग आहे. तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते.

१. 'जनांसाठी इतिहास' म्हणजे काय?

२. भारतातील कोणत्या संस्थेत 'सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी' हा स्वतंत्र विभाग आहे?

३. इतिहासाविषयी लोकांच्या मनात कोणते गैरसमज असतात?

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

१. 'जनांसाठी इतिहास' या संज्ञेसाठी 'उपयोजित इतिहास' हा पर्यायी शब्द वापरात आहे. लोकांच्या वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणून याकडे पाहिले जाते.

२. बंगळुरू येथील 'सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी' या संस्थेत 'सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी' हा स्वतंत्र विभाग आहे.

३. इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात.
ते पुढीलप्रमाणे –

१. इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो.

२. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्रांशी जोडला जाऊ शकत नाही.

shaalaa.com
उपयोजित इतिहास आणि वर्तमानकाळ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.3: उपयोजित इतिहास - लांब उत्तरे १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 1.3 उपयोजित इतिहास
लांब उत्तरे १ | Q ४.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×