Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
१. आकृती पूर्ण करा. (०२)

|
“अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हाय बक्कळ?” “सॉरी, मावशी खरंच सॉरी,” आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसंतरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडेकाकाही आले. आज बाबा आणि पावडेकाका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडेकाकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडेकाकांच्या तळाव्याकडं गेलं. एकदम गोजिरा, गुलाबी तळावा. कुठं चिरण्या नाहीत की काही नाही! 'एकदम लोन्यागत पाय हाय काकांचा', रेखामावशी स्वत:शीच पुटपुटल्या. त्यांनी स्वत:च्या पायाकडं पाह्यलं ... पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या... माती धूळा बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक-स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले. “मामा, मी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपच्या साहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत, हे सांगू शकतो”, सुमितनं सांगितलं. “सुमित, अरे, पाय स्वच्छ आहेत की नाही, हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्हां टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? अरे, सगळयांत भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरला की काय तुम्ही लोक?” बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली. “मामा, गंमत तर बघ तू माझ्या ॲपची...त्याचं नाव आहे फूटप्रिन्ट्स”, असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला. |
२.
अ) आकृती पूर्ण करा. (०१)

आ) एका वाक्यात उत्तर लिहा. (०१)
सुमितने तयार केलेले ॲप कोणते?
३. स्वमत (०३)
तुमच्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशींचा अनुभव थोडक्यात सांगा.
Advertisements
उत्तर
१.
२.
अ)
आ) फुटप्रिन्ट्स हे सुमितने तयार केलेले ॲप होते.
३. माझ्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशी म्हणजेच मीना मावशी जणू आमच्या घरातील एक सदस्यच. अनेक वर्षांचं विश्वासाचं नातं आहे आमच्यात. संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवून आम्ही निश्चिंत असतो. त्या मात्र प्रामाणिकपणे सातत्याने कामात गढलेल्या असतात. पतीच्या निधनानंतरही साऱ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारी मीना मावशी आपल्या मुलांच्या बरोबरीने स्वत:ही रात्रशाळेत शिक्षण घेते. मुलांच्या उच्चशिक्षणासाठी, त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी ती सतत धडपडते. आम्ही आमच्याकडचे दिलेले ज्यादाचे सामान ती फक्त स्वत:पुरते राखून ठेवत नाही, तर वस्तीतल्या इतर गरजूंनाही ती ते पुरवते. मीना मावशी कडक शिस्तीची आणि स्वाभिमानीही आहे. आपल्या तत्त्वांशी ती कधीही तडजोड करत नाही. त्यामुळे, आम्हांला तिचा खूप अभिमान वाटतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

कारणे लिहा.
स्नेहल त्रासली, कारण ______.
कारणे लिहा.
पावडेकाकांचा चेहरा पडला, कारण ________.
कारणे लिहा.
रेखामावशीची पावलं अधिक सुंदर आहेत कारण ______.
कारणे लिहा.
अभिषेकचे बाबा म्हणतात, पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट, कारण ______
उत्तरे लिहा.
स्नेहलने केलेला निश्चय-
उत्तरे लिहा.
अभिषेकने केलेला निश्चय-
पाठातील पात्रांची स्वभाव वैशिष्ट्ये लिहून तक्ता पूर्ण करा.
| व्यक्ती | अभिषेक | सुमित | स्नेहल | पावडेकाका | रेखामावशी |
| स्वभाव | |||||
| वैशिष्ट्ये |
'आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे, आपल्याला सहजतेने पुसता येत नाहीत’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
‘तापानं फणफणलीय आपली धरती’ ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. कोण ते लिहा. (०२)
अ) रेखा मावशींना सायकल घेऊन देणारा – ______
ब) झर्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे पाय असणार्या – ______
क) स्वच्छ आणि मऊसूत पाय असणारे – ______
ड) पायाची स्वच्छता बघणारा – ______
|
“गेल्या महिन्यापतुर चालतच येत हुते; पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिलीया मला. तवा आता सायकलनं येते”, अशी अजून बरीच माहिती त्यांनी भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत? रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं! त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी दोन झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं; पण एवढी सगळी सगळी माहिती सुमित का घेतोय, तेच कुणाला कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. “आणि आता पाहा, या आहेत रेखा मावशींच्या फूटप्रिन्ट्स...!” असं म्हणत त्यानं मोबाइलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा! सगळे 'आ' वासून पाहत होते आणि त्या निळया तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली... एकदम चंदेरी वर्खात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले... 'सिल्व्हर फूटप्रिन्ट्स! दि मोस्ट क्लीन फूटप्रिन्ट्स!!' “वाऽ पाह्यलंत रेखा मावशींचे पाय चंदेरी आहेत. एकदम स्वच्छ. झऱ्याच्या स्पटिक स्वच्छ पाण्यासारखे,” सुमित ओरडला. “ह्याऽ हे भलतचं!” रेखामावशींच्या पाायाकडे पाहत पावडेकाका म्हणाले. सुमितनं हलकेच पावडेकाकांच्या गोजिर्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला, “काका, आपण तुमच्या पायाचं पाहूया का?” “त्यात पाह्यचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत....!” पावडेकाका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. “पण मला काय सांगतंय तुमचं ॲप, ते तरी पाहूया,” त्यांनी पुस्ती जोडली. |
२. आकृती पूर्ण करा (०२)
अ)
आ)
३. स्वमत (०३)
जागतिक तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे असे तुम्हांला वाटते ते तुमच्या शब्दांत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
|
अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखामावशी आत आल्या. आल्या आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांडयांकडे आपला मोर्चा वळवला. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्यांच्याकडे सुमित आला होता कानपूरहून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो आय. आय. टी. कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला दोन वाजले. “काय हो हे, तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता?'' हॉलमधून स्नेहलचा आवाज आला. अभिषेक हॉलमध्ये आला तर रेखामावशी फरशी पुसत होत्या; पण मागे त्यांच्या पायाचे काळे मळकट ठसे पुसलेल्या फरशीवर उमटले होते. स्वच्छतेची भोक्ती असलेली स्नेहल त्यामुळे त्रासली होती. रेखामावशीही बिचाऱ्या वरमल्या होत्या. "अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हायबक्कळ?”' "सॉरी, मावशी खरंच सॉरी,'' आपण त्यांच्या मळकट पायाबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसंतरी वाटलं. |
- आकृती पूर्ण करा: (2)

- चौकटी पूर्ण करा: (2)
- दार उघडणारा - ______
- फरशी पुसणाऱ्या - ______
- अभिषेकचा आतेभाऊ - ______
- स्वच्छतेची भोक्ती - ______
- स्वमत:
'सर्वांनी आठवड्यातून एकदातरी सायकलचाच वापर करावा' या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. (3)
