Advertisements
Advertisements
प्रश्न
अकराव्या शतकात युरोपमधील ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी जेरुसलेम व बेथलेहॅम ही शहरे परत मिळवण्यासाठी वेळोवेळी लढाया केल्या; कारण ______.
विकल्प
त्यांना प्रादेशिक विस्तार करावयाचा होता.
इस्लामी सत्ताधीशांनी ही पवित्र शहरे आपल्या ताब्यात ठेवली होती.
त्यांना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळवायचा होता.
ही अत्यंत प्रगत शहरे होती.
Advertisements
उत्तर
अकराव्या शतकात युरोपमधील ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी जेरुसलेम व बेथलेहॅम ही शहरे परत मिळवण्यासाठी वेळोवेळी लढाया केल्या; कारण इस्लामी सत्ताधीशांनी ही पवित्र शहरे आपल्या ताब्यात ठेवली होती.
स्पष्टीकरण:
जेरुसलेम आणि बेथेलहॅम ही शहरे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आहेत. अकराव्या शतकात ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती. ही शहरे परत मिळवण्यासाठी ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या लढायांना धर्मयुद्धे (क्रुसेडस्) म्हणतात.
