हिंदी

(अ) खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (१) कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे - (२) जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले तंत्र - कामापुरते आणि कामासाठी वाहन - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(१) कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे -    (२)

(२) जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले तंत्र -    (२)

कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग, हे तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता, अनुभवता यावे, त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी, गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते; पण आहेच वाहन तर चार-सहा मैलांवरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहाण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत?

वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल, तर तातडीचा भाग म्हणून कधी तरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल, तर वाहनाचा उपयोग होईल; पण सहज आणि सुखाने येणे-जाणे सोडून वेगाने येरझारा कशासाठी घालावयाच्या? आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत.

(३) स्वमत अभिव्यक्ती -    (४)

‘जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो,’ - हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

किंवा

‘मनाचा ब्रेक - उत्तम ब्रेक’ याबाबतची तुमची भूमिका सोदाहरण लिहा.

आकलन
Advertisements

उत्तर

(१) कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे -

(२) जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले तंत्र -

(३) आजच्या धावपळीच्या जीवनात वाहनांचे महत्त्व खूप वाढले आहे. कामासाठी, शिक्षणासाठी किंवा आवश्यक प्रवासासाठी वाहनांचा उपयोग केल्यास वेळेची बचत होते आणि कार्यक्षमता वाढते. त्यामुळे जीवने अधिक सुकर आणि नियोजनबद्ध बनते. मात्र वाहनांचा वापर गरजेनुसार आणि संयमाने केला तरच जीवन अर्थपूर्ण होते. दिखावा, स्पर्धा किंवा ऐश्वर्य दाखवण्यासाठी वाहनांचा वापर केल्यास त्यातून ताणतणाव आणि अपव्यय वाढतो. त्यामुळे वाहनांचा योग्य आणि आवश्यक तेवढाच उपयोग केल्यास जीवन अधिक आनंदी आणि समाधानकारक बनू शकते.

किंवा

आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस सतत वेगाने पुढे जात आहे. कामाचा ताण, स्पर्धा, जबाबदाऱ्या यामुळे मनावर मोठा ताण येतो. जसे वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रेक आवश्यक असतो, तसेच जीवनात मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी “मनाचा ब्रेक” आवश्यक असतो. राग, मत्सर, अहंकार किंवा उतावळेपणा यामुळे माणूस चुकीचे निर्णय घेतो. अशा वेळी जर आपण क्षणभर थांबून विचार केला, शांतपणे परिस्थिती समजून घेतली, तर अनेक चुका टाळता येतात. हाच मनाचा ब्रेक होय. तो आपल्याला संयम, शांती आणि योग्य विचार करण्याची सवय लावतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×