हिंदी

(१) चौकटी पूर्ण करा: (i) क्षणिक सुख देणारे - ______ (ii) चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - ______ (iii) व्यक्‍तीला सदैव सुख देणारा - ______ (iv) चिरकाल टिकणारा आनंद - ______ जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पा - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे सूचनांनुयार कृती करा:    [8]

(१) चौकटी पूर्ण करा:

  1. क्षणिक सुख देणारे - ______
  2. चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - ______
  3. व्यक्‍तीला सदैव सुख देणारा - ______
  4. चिरकाल टिकणारा आनंद - ______
जैवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलीयांसी।
जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।।
जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।
उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।।
उदकाचें सुख तें किती। सवेंचि क्षणें तृषितें होती।
योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।
उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां।
योगियांचे गोडपण पाहतां। होय निवविता सर्वेंद्रियां।।
मेघमुखें अध:पतन। उदकाचें देखोनि जाण।
अध:पातें निवती जन। अन्नदान सकळांसी।।
तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें।
जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्धरी।।

(२) आकृती पूर्ण करा:

(३) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा:

  1. तृषित = ------
  2. मृदुत्व = ------
  3. रसना = ------
  4. निवविणे = ------

(४) 'योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे ' हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

आकलन
Advertisements

उत्तर

    1. क्षणिक सुख देणारे - उदक
    2. चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - चकोर
    3. व्यक्‍तीला सदैव सुख देणारा - योगीपुरुष
    4. चिरकाल टिकणारा आनंद - स्वानंद

  1.   
    1. तृषित = तहानलेला
    2. मृदुत्व = मऊपणा
    3. रसना = जीभ
    4. निवविणे = संतुष्ट करणे.
  2. संत एकनाथ महाराजांनी आपल्या 'योगी सर्वकाळ सुखदाता' या काव्यरचनेत योगी पुरुषाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. या कवितेत त्यांनी योगी पुरुषाची तुलना पाण्याशी केली असून, योगी पाण्यापेक्षा श्रेष्ठ कसा आहे हे अनेक उदाहरणांद्वारे स्पष्ट केले आहे.

    कवी सांगतात की, पाणी केवळ शरीरावरील बाह्य मळ धुऊन टाकते, तर योगी अज्ञानात असलेल्या लोकांना ज्ञान देऊन त्यांचा बाह्य व आंतरिक शुद्धीकरण करतो. पाण्यामुळे एक वेळ तहान भागते, पण योगी पुरुषाच्या ज्ञानामृतामुळे कायमचे समाधान मिळते. पाण्याचे सुख तात्पुरते असते, परंतु योगी पुरुषाने दिलेले सुख शाश्वत आणि न विकृत असते. योगी सर्वांना आत्मसुखाचा अनुभव देतो. पाण्याची गोडी ही जिभेपुरती मर्यादित असते, पण योगीच्या गोड वाणीतील उपदेश संपूर्ण इंद्रियांना शांतता देण्यास समर्थ असतो.

    या सर्व दृष्टिकोनातून योगी पुरुषाचे महत्त्व आणि त्याचे पाण्यापेक्षा किती श्रेष्ठ स्थान आहे, हे या रचनेतून ठळकपणे समोर येते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×