Advertisements
Advertisements
प्रश्न
योग्य जोड्या जुळवून त्याबाबत स्पष्टीकरण लिहा.
| 'अ' स्तंभ | 'ब' स्तंभ |
| 1. बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ | a. गुरुत्वानुवर्ती हालचाल |
| 2. प्ररोह संस्थेची होणारी वाढ | b. रसायन-अनुवर्ती हालचाल |
| 3. मूळ संस्थेची होणारी वाढ | c. प्रकाशानुवर्ती हालचाल |
| 4. पाण्याच्या दिशेने होणारी वाढ | d. वृद्धी असंलग्न हालचाल |
| e. जलानुवर्ती हालचाल |
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements
उत्तर
| 'अ' स्तंभ | 'ब' स्तंभ | स्पष्टीकरण |
| 1. बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ | b. रसायन-अनुवर्ती हालचाल | रसायन-अनुवर्तन म्हणजे विशिष्ट रसायनांना वनस्पतीच्या ठरावीक भागांनी दिलेला प्रतिसाद. वनस्पतीच्या भागांची या प्रतिसादामुळे हालचाल होते. |
| 2. प्ररोह संस्थेची होणारी वाढ | c. प्रकाशानुवर्ती हालचाल | वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाशाच्या दिशेने वाढ दर्शवते. यामुळे प्ररोह संस्था ही नेहमीच प्रकाशानुवरती हालचाल दर्शवते. |
| 3. मूळ संस्थेची होणारी वाढ | a. गुरुत्वानुवर्ती हालचाल | वनस्पतीची मुळे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल दर्शवतात. म्हणून मूळ संस्थेची वाढ ही गुरुत्वानुवर्ती हालचाल आहे. |
| 4. पाण्याच्या दिशेने होणारी वाढ | e. जलानुवर्ती हालचाल | जलानुवर्ती हालचाल दर्शवणारे वनस्पतीचे भाग म्हणजे पाण्याच्या दिशेने होणारी वाढ दाखवतात. वनस्पतींची मुळे जलानुवर्ती हालचाल दर्शवतात. |
shaalaa.com
समन्वय
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
