मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

वरद/वरदा नाईक विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने तुमच्या विद्यालयात शिबिर आयोजित करण्याची विनंती करणारे पत्र मुख्याध्यापकांना लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

दिनांक: १५ ऑक्टोबर, २०२२ 

प्रति,
माननीय श्री. सुरेंद्र जोशी सर,
मुख्याध्यापक,
शारदा विद्यालय.

विषय: विद्यालयात फूटबॉलचे तंत्रशुद्ध शिक्षण देणारे शिबीर आयोजित करण्याबाबत.

महोदय,
    मी वरद नाईक आमच्या विद्यालयातील क्रीडा विभागाचा विदयार्थी प्रमुख या नात्याने विद्यालयात फूटबॉलचे शिबीर आयोजित करण्यासाठी हे पत्र लिहित आहे.

    अंशुल स्पोर्टस्‌ क्लबची जाहिरात वाचनात आली. हे शिबीर खास १० ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यासाठी आहे. हे शिबीर १ ते ८ नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुट्टीत आहे. या शिबिरातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात १५ वर्षांचा प्रगाढ अनुभव असणाऱ्या तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे शिबीर मोफत असून फूटबॉलचे तंत्रशुद्ध शिक्षण देणार आहे. शिबिरांना क्रीडासाहित्य मोफत मिळणार आहे.

    शहरातील इतर शाळांपेक्षा खूप मोठे मैदान आपल्या शाळेला लाभले आहे. शाळेतील अनेक विदयार्थी प्रशिक्षण घेण्यास उत्सुक आहेत. विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण अनेक अभिनव उपक्रम राबवित असता. कुशल मुख्याध्यापक म्हणून आपला नावलौकिक आहेच. अंशुल स्पोर्टस्‌ क्लब नागपूरमधील रामदास पेठमध्ये कार्यरत आहे.

    विदयार्थ्यांच्या क्रीडानैपुण्याला वाव देण्यासाठी कृपया आपण आपल्या विद्यालयात हे शिबीर आयोजित करावे व फूटबॉलचे शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी आम्हा विदयार्थ्यांना दयावी, ही नम्र विनंती.

तसदीबद्‌दल क्षमस्व.
कळावे
आपला विश्‍वासू,
वरद नाईक
विद्यार्थी प्रतिनिधी,
शारदा विद्यालय,
नागपूर - 440001
ई-मेल आय.डी. - [email protected] 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2022-2023 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×