मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

उत्तार्‍याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) पुढील विधाने चूक का बरोबर ते लिहा: 2 i. पुण्याला विश्‍वकोशाचा अध्यक्ष म्हणून लेखक गेले. ii. बाळ थंडीने कुडकुडत रडत होते. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उत्तार्‍याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) पुढील विधाने चूक का बरोबर ते लिहा: 2

  1. पुण्याला विश्‍वकोशाचा अध्यक्ष म्हणून लेखक गेले.
  2. बाळ थंडीने कुडकुडत रडत होते.
  3. लेखकाने पाचपन्नास रुपयांच्या नोटा व शाल बाईला दिली.
  4. बाई तिचे छोटे मूल एका झाडाखाली ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती.

पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही.

पुढे वाईला विश्‍वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, “त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.”  या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.

कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही.

(2) आकृती पूर्ण करा: 2

(3) स्वमत: 3

‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

आकलन
Advertisements

उत्तर

(1) 

  1. चूक
  2. बरोबर
  3. बरोबर
  4. चूक

(2)

(3) 

‘शाल’ हे सन्मानाचे प्रतीक मानले जाते, तर ‘शालीनता’ हा सज्जन व्यक्तीचा स्वभावगुण असतो. ज्या व्यक्तीत स्वभावतः शालीनता असते, तिला शाल अधिक शोभून दिसते. खरं तर शालीन माणसाला वेगळ्या सन्मानचिन्हाची गरज नसते; त्याचा स्वभावच त्याला मान देतो. परंतु जो दुर्जन असतो, त्याला शाल घातली तरी त्याच्यात शालीनता निर्माण होत नाही. आपल्या संस्कृतीत कर्तृत्ववान व्यक्तीचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्याची परंपरा आहे. अशा सन्मानामुळे त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अधिक उठून दिसते आणि समाजाला प्रेरणा मिळते. त्यामुळे अशा व्यक्तीचा शाल देऊन सत्कार करणे योग्य ठरते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×