Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्ये पूर्ण करा. (२)
अ. एक सांगू? लक, भाग्य, किस्मत,-
आ. 'माझा दिवस' अखेर आला होता... गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्यातले-
|
आता मी उतरू लागले होते. जेमतेम ४०-५० पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला... एक सांगू? लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत; पण fortune favours the braves यावर माझा पूर्ण विश्वास आहे... जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलिंडर आम्हांला दिसला. माझ्या शेरपाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या 'डेथ झोन' मधून सहीसलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे... आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. 'माझा दिवस' अखेर आला होता... गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर 'एव्हरेस्ट' मी सर केले होते! गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी यांचे धडे तर मिळालेच; पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते, हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाहीत हे ठरतं. तुम्हां कुमारवयोगटांतल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं, की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं, तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं.. |
२) आकृती पूर्ण करा. (२)
| गिर्यारोहणाने अरुणिमाला दिलेले धडे | |||
३) स्वमत- (३)
'आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते, हे महत्त्वाचं वाटतं मला.' या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
१)
अ. एक सांगू? लक, भाग्य, किस्मत,- डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत; पण fortune favours the braves यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
आ. 'माझा दिवस' अखेर आला होता... गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्यातले- एक महत्त्वाचे शिखर 'एव्हरेस्ट' मी सर केले होते!
२)
| गिर्यारोहणाने अरुणिमाला दिलेले धडे | |||
| आत्मविश्वास जागवला. | नेतृत्वाचे धडे मिळाले. | गटबांधणीचे धडे मिळाले. | पोलादी कणखरपणा निर्माण केला. |
३) माणसाच्या आयुष्यात यश, प्रसिद्धी, संपत्ती मिळवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात. यासाठी चुकीचे मार्ग निवडणारे, झटपट श्रीमंत होणारे, प्रसिद्धीच्या झोतात येणारे लोक एक चांगली व्यक्ती मात्र बनू शकत नाहीत. परिश्रमाने, सत्याच्या आधारावर मिळवलेले यश हे आपल्याला अधिक चांगली व्यक्ती म्हणून जगण्यास पाठबळ देते. याबाबतीत अतिशय प्रसिद्ध असे वाल्या कोळ्याचे उदाहरण देता येईल. लोकांना मारणारा, लुटणारा, त्यांची संपत्ती लुबाडणारा वाल्या कोळी धनवान होता; मात्र कुप्रसिद्ध होता. त्याच वाल्याकोळ्याने केवळ 'रामनाम' जपाने सर्व संपत्तीचा त्याग करून 'रामायणा' सारखे महाकाव्य लिहिले आणि जगप्रसिद्ध वाल्मिकी ऋषी म्हणून लोकांमध्ये आदराचे स्थान मिळवले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.

खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
कोण ते लिहा.
सर्वांत मोठा मोटिव्हेटर - ______
कोण ते लिहा.
अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे - ______
कोण ते लिहा.
फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन - ______
‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’ तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा.
(अ) ______
(आ) ______
(इ) ______
(ई) ______
‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृती पूर्ण करा. (२)
| अरुणिमाने डॉक्टर व सहकार्यांना दिलेला धीर |
| ↓ |
| ____________ |
|
बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकार्यांना मीच धीर दिला, 'डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल.' डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी स्वत:चे एक युनिट रक्त मला दिले आणि माझ्यादेखतच माझा पाय कापला गेला. इकडे मी जीवनमरणाच्या सीमारेषेवर होते; पण हॉस्पिटलबाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. 'फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती सात तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली' ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या 'एम्स' मध्ये (AIIMS) हलवले, राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या... पण... पण शल्य एकच होतं, की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. 'अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली' इथपासून ते 'अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला', इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल चार महिने 'एम्स' मध्ये (AIIMS) राहिल्यानंतर, शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती; पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते. |
२) जोड्या जुळवा. (२)
| 'अ' गट | 'ब' गट |
| १. बरेलीचे हॉस्पिटल | अ. एम्स हॉस्पिटल |
| २. जीवनमरणाची | आ. अंतरंग घायाळ करणारे |
| ३. दिल्ली | इ. ना भूलतज्ज्ञ, ना पुरेसे रक्त |
| ४. मानसिक जखमा | ई. सीमारेषा |
३) स्वमत- (३)
’शारीरिक जखमा मलमपट्टीने बऱ्या होतात; पण मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे असतात“ या विधानाचा अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) एका शब्दात उत्तरे लिहा. (२)
- अरुणिमाचा निर्धार -
- अरुणिमाचा पहिला टप्पा -
|
माझ्या, एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. 'शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.' अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावारी नेलं; पण माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला 'शक्य आहे' असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. 'एम्स' मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनोन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब – आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ’अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास... तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला...!“ |
२)
1. कोण ते लिहा. (१)
एव्हरेस्ट सर करणारी महिला -
2. खालील कृतीतून व्यक्त होणारा गुण लिहा. (१)
माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले.
३) स्वमत- (३)
’आपल्या आतलं एव्हरेस्ट आपल्यालाच सर करायचे असते“ हे विधान सोदाहरण तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. नावे लिहा. (2)
- गर्दीनं फुललेलं स्टेशन - ______
- अरुणिमाचे गाव - ______
|
दोस्तांनो, मी... अरुणिमा सिन्हा! आज तुम्ही गुगलवर शोधले तर ‘माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय’ असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी! पण एक सांगू? मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही... नव्हते.. धडधाकट असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणारेय तुम्हांला... लखनऊपासून २०० किमी. अंतरावर असणारं आंबेडकरनगर हे माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं. माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाब (मोठ्या बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर ‘आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील’, हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि ‘कॉल लेटर’ आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. ११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. |
2. कारणे लिहा. (2)
- अरुणिमाला दिल्लीला जाणे भाग होते; कारण ______
- अरुणिमाने ‘सीआयएसएफ’ मध्ये नोकरीसाठी अर्ज केला; कारण ______
3. स्वमत (3)
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) कृती करा. (2)

|
पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. ‘एम्स’ मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनाेन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब-आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ‘‘अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास... तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला...!’’ ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र’ बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे दीड वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून सुलाखून निघत होते. |
(2) एका शब्दात उत्तर लिहा. (2)
- एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला.
- अरुणिमाबरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती.
(3) स्वमत. (3)
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
