मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा. संत ज्ञानेश्वर

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत माहिती व कार्ये लिहा.

संत ज्ञानेश्वर

सविस्तर उत्तर
Advertisements

उत्तर

  1. ते संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी वारकरी चळवळीला धर्माची प्रतिष्ठा दिली.
  2. त्यांनी सामान्यांना आचरता येईल, असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्मांची प्रतिष्ठा मिळवून दिली.
  3. त्यांचे जीवन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले परंतु त्यांनी कधीही मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही.
  4. त्यांनी 'भगवद्गीता' या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा 'भावार्थदीपिका' अर्थात 'ज्ञानेश्‍वरी' हा ग्रंथ रचला.
  5. ज्ञानेश्वरीतील 'पसायदान' उदात्त संस्कार करणारे आहे. त्यांनी 'अमृतानुभव' या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथांतून व अभंगांतून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले.
  6. त्यांचे भाऊ संत निवृत्तिनाथ आणि संत सोपानदेव आणि त्यांची बहीण मुक्ताबाई यांच्या काव्यरचना देखील प्रसिद्ध आहेत.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 5: शिवपूर्वकालीन महाराष्ट्र - स्वाध्याय [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 5 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ १२७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×