मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

टीपा लिहा. वीस कलमी कार्यक्रम - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

टीपा लिहा.

वीस कलमी कार्यक्रम

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला. यातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे:

  1. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनांत वाढ करणे.
  2. कामगारांचा उद्योगक्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे.
  3. करचुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे.
  4. जीवनावश्यक वस्तूंचे दरनियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे.
  5. हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे.
shaalaa.com
वीस कलमी कार्यक्रम
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.04: आर्थिक विकास - स्वाध्याय [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 1.04 आर्थिक विकास
स्वाध्याय | Q २. (ब) (२) | पृष्ठ २२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×