Advertisements
Advertisements
प्रश्न
तीन मुलगे व दोन मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा:
घटना A: समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे.
घटना B: समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे.
बेरीज
Advertisements
उत्तर
समजा, B1, B2, B3 हे मुलगे आणि G1, G2 या मुली आहेत.
यांच्यातून दोघांची समिती बनवायची आहे.
S = {B1B2, B1B3, B2B3, B1G1, B1G2, B2G1, B2G2, B3G1, B3G2, G1G2}
∴ n(S) = 10
घटना A: समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे.
A = {B1G1, B1G2, B2G1, B2G2, B3G1, B3G2, G1G2}
∴ n(A) = 7
P(A) = `(n(A))/(n(S))`
= `7/10`
घटना B: समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे.
B = {B1G1, B1G2, B2G1, B2G2, B3G1, B3G2}
∴ n(B) = 6
P(B) = `(n(B))/(n(S))`
= `6/10`
= `3/5`
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
