मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी वाणिज्य (इंग्रजी माध्यम) इयत्ता १२ वी

थोडक्यात उत्तरे लिहा.कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

थोडक्यात उत्तरे लिहा.
कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा.

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

या कथेत पावलापावलावर कलाटणी मिळत जाते. त्या प्रसंगांमधला एक प्रसंग मला खूप महत्त्वाचा वाटतो. तो संपूर्ण कथेलाच कलाटणी देतो. भर मध्यरात्री कथानिवेदक, मुक्ता व अनू भिड्यांना भेटण्यासाठी निघाले. वाचकाला वाटू लागते की आता काय तो सोक्षमोक्ष लागेल. ती नोट भिड्यांकडे असेल, तर मिळेलच. मग सर्व प्रश्न मिटतील आणि टॅक्सीवाल्याकडे असेल, तर शोधच खुंटेल. मात्र घडते ते विलक्षणच. वाचकाच्या कल्पनेतही नसलेले घडते. भिड्यांना घेऊन येणाऱ्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस येतो. या अपघाताने अकल्पित घटना घडतात. नोट मिळते, टॅक्सी ड्रायव्हरचे या सर्वांशी भावनिक नाते निर्माण होते. नोट मिळाल्यामुळे नोटेचा इतिहास कळतो. त्या मुलीच्या आजारपणाचे हृदयद्रावक दर्शन घडते. अनू त्या मुलीच्या कुटुंबीयांशी मनाने जोडली जाते. अखेरीस हेही स्पष्ट होते की त्या मुलीचे वडील तो टॅक्सी ड्रायव्हरच होता. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. त्या एका अपघाताच्या प्रसंगाने कथेला खूप उंचीवर नेऊन ठेवलेले दिसून येते.

shaalaa.com
शोध
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3.01: शोध - कृती (४) [पृष्ठ ७७]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 3.01 शोध
कृती (४) | Q 4 | पृष्ठ ७७

संबंधित प्रश्‍न

अनूने घर सोडले; कारण ______________


‘जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा’, असं अनु म्हणाली. कारण  ______________


अनूने डॉक्टर व्हावे, असे कथानिवेदकाला वाटले; कारण ______________


खालील नातेसंबंध लिहा.
अनु आणि आबा ___________


खालील नातेसंबंध लिहा.
भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर ___________


खालील नातेसंबंध लिहा.
अनू आणि सुनीता ___________


कृती करा.

अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गोष्टी


कृती करा.

आबांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये


अनुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारांतून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यांतील फरक स्पष्ट करा.

डॉक्टरचा पेशा नर्सचा पेशा
   
   
   
   
   
   

घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा. 


थोडक्यात उत्तरे लिहा.
कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा.


तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.


तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभावविशेष.


‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.


एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हांला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.


'कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध' तुमच्या शब्दांत लिहा.


'स्वत:चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो,' या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.


कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हांला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा.


‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे.’ या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.


अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा.


‘शोध’ कथेतील ‘टॅक्सी ड्रायव्हर’ या पात्रा विषयीचे तुमचे मत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×